मुंबई : रोशेल राव आणी कीथ सिकेराने तामिळनाडूच्या महाबलिपुरममध्ये रविवारी लग्न केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघांनी सोशल मीडियावरून दिली माहिती. दोघं एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत होते. 



असं सांगितलं जातं की दोघांनी गेल्यावर्षी साखरपुडा केला होता. तेव्हा देखील अधिकृत माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली होती. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, एका वर्षानंतर ते दोघे लग्न करणार आहेत. 



रोशेल आणि कीथ बिग बॉस 9 मध्ये दिसले होते. आणि त्यानंतर ते दोघे भरपूर चर्चेत होते. शोमध्येच दोघे एकमेकांच्या भरपूर जवळ होते. 



एवढंच नाही तर बिग बॉसने कीथ आणि रोशेल यांना लग्न करण्यास सांगितलं. तेव्हा कीथने आपल्या नात्याला आणखी काही वेळ हवा असं स्पष्ट केलं होतं. 



कीथ आणि रोशेलने डेस्टिनेशन वेडिंग केली असून यांच्या लग्नाला अभिनेत्री एवलीन शर्मा देखील सहभागी होती. 



हे दोघे पहिल्यांदा एका फ्लाइटमध्ये भेटले होते. त्यानंतर सोशल मीडियावरून त्यांची ही ओळख कायम राहिले. 



कीथ आणि रोशेल यांनी अवघ्या काही खास मित्र परिवारासोबत हे लग्न केलं.