मुंबई : अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्राकडून थेट अध्यात्मिक वाटेवर निघालेल्या एका अभिनेत्रीनं वेळोवेळी चाहते आणि नेटकऱ्यांना थक्क केलं आहे. अगदी तिच्या बोल्ड पोस्ट असो किंवा मग अध्यात्माशी संबंधित तिचं मत किंवा एखादी भूमिका असो. ती बोलली आणि चर्चा झाली नाही, असं फार क्वचितच घडलं. अशा या अभिनेत्रीनं नुकतंच शरीरातील अशुद्ध घटक बाहेर पडावेत या एका कारणासाठी उपवास केला होता. पण, हा उपवास फळणं दूर, तिला यामुळं त्रासच जास्त झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री आणि बहुचर्चित मॉडेल म्हणजे सोफिया हयात. फास्टिंग आणि एनिमाच्या माध्यमातून ती शरीर शुद्धीकरणाचा सराव करत होती. पण, त्यादरम्यानच तिच्या शरीरातून मीठ आणि इलेक्र्टोलाईट्स कमी झाले. हे प्रमाण इकतं खाली गेलं की तिला परिचारिकांनी पाकिटंच्या पाकिटं मीठही खाण्याचा सल्ला दिला. (Bigg boss fame actress Sofia Hayat admitted to hospital troubled because of fast)


सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत सोफियानं तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. परिस्थिती इतकी वाईट झाली, की तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तिथे तिला उपवास तोडून शरीरासाठी अन्नग्रहण करावं लागलं. 


सध्या तिची प्रकृती हळुहळू सुधारत आहे. रुग्णालयातून सोफियाला सुट्टी मिळाली आहे. असं असलं तरीही रुग्णालयाकडून तिच्या हाती टेकवण्यात आलेल्या बिलामुळं मात्र तिला धक्काच बसला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat)


युकेमध्ये तिच्या नावे आरोग्य विमा असल्यामुळं इथं तिला त्याचा फायदा झाला, अन्यथा खर्चाच्या आकड्यांनीही तिला अडचणीत आणलं असतं, अशीच परिस्थिती तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली. 


दरम्यान, सोफिया चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती बऱ्याच कारणांनी सर्वांच्या नजरा वळवत असते. मग ते कारण तिच्या खासगी जीवनाशी निगडीत का असेना.