कोणी बॉलिवूड स्टार नव्हे, `हा` हॉलिवूड सेलिब्रिटी आहे उर्फी जावेदचा BOYFRIEND
तो आहे तरी कोण, जाणून बसेल धक्का
मुंबई : कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेत असणारी 'बिग बॉस' फेम सेलिब्रिटी उर्फी जावेद (Urfi Javed)पुन्हा एकदा सगळ्यांनाच थक्क करत आहे. यावेळी कारण ठरतंय ते म्हणजे उर्फीचं खासगी आयुष्य.
फॅशन सेन्सपेक्षाही सध्या उर्फीच्या खासगी आयुष्यानं अधिक चर्चांना वाव दिला आहे. कारण, म्हणे तिनं अखेर तिच्या प्रियकराच्या नावाचा खुलासा केला आहे.
हल्लीच तिनं इन्स्टाग्रामवर प्रश्नोत्तरांचं एक सेशन घेतलं. यामध्ये तिनं फॉलोअर्सच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली.
उर्फीनं दिलेल्या या उत्तरांमध्ये एक उल्लेख असा होता, जिथं सगळ्यांच्या नजरा खिळल्या.
एका नेटकऱ्यानं तिला, तुझा प्रियकर कोण ? असा प्रश्न विचारला.
या प्रश्नाचं उत्तर देताना तिनं क्रिस इवांस याचं नाव घेतलं. कोणी त्याला ओळखता तर लगेच फोन करायला सांगा असंही तिनं इथं म्हटलं.
उर्फीनं हे मजा मस्करीत म्हटलं असलं तरीही तिनं घेतलेल्या या नावानं क्षणभर अनेकांच्या भुवया उंचावल्या.
क्रिस इवांस मार्वल चित्रपटांमध्ये 'कॅप्टन अमेरिका' ही भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो.
उर्फीच्या विरोधात तक्रार?
याच सेशनदरम्यान, तू फारच क्यूट आहेस यासाठीच मी तुझ्याविरोधात तक्रार दाखल करत आहे, असंही एक फॉलोअर म्हणाला.
हे पाहताच उर्फीही काही क्षणांसाठी घाबरली, पण नंतर ही प्रतिक्रिया तिच्या लक्षात आली.
का होते उर्फीच्या नावाची इतकी चर्चा ?
मागील काही महिन्यांपासून एकाएकी उर्फी जावेद हिच्या नावाची बरीच चर्चा सुरु झाली. तिनं एक सोशल मीडिया पोस्ट करायची खोटी, की चर्चांना उधाण.
उर्फीची अतरंगी स्टाईल स्टेटमेंट, स्वत:वर प्रेम करण्याचा आणि आगळ्यावेगळ्या जगात आनंदी राहण्याचा तिचा अंदाज तिला कायम चर्चेत ठेवण्यास कारणीभूत ठरतो.