Bigg Boss Marathi : स्पर्धकांसाठी आता कठोर नियम
स्मॉल स्क्रिनवरील बिग बॉस मराठी या रिआलिटी शोबदद्ल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील बिग बॉस मराठी या रिआलिटी शोबदद्ल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशाचतच आता शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनची, घराची व सहभागी स्पर्धकांची प्रचंड उत्सुकता लागून आहे. एन्टरटेन्मेंट होणार अनलॉक या टायटल सह बिग बॉसचे नवे लवकरच सुरु होणार आहे.
नेहमीपेक्षा हा कार्यक्रम आणखी भव्य-दिव्य पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा आहे. टास्क, घरातले नियम या सर्वांत आणखी एका गोष्टीचा या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धंकांना सामना करायचा आहे. तो म्हणजे कोरोना काळातील सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत.
तिसऱ्या सीजनचा 'बिग बॉस मराठी'चा सेट भव्य असून नव्या थीम नुसार डिझाईन करण्यात आला आहे. हा सेट गोरेगावच्या फिल्म सिटी येथे उभारण्यात आला आहे. कोरोना नियमांचे पालन करत घरात येणाऱ्या स्पर्धकांना क्वारंनटाईन करण्यात येणार आहे आणि प्रत्येक स्पर्धकांची टेस्ट देखील केली जाईल.
यंदाच्या बिग बॉस मराठीच्या सीजनमध्ये काय राडा होणार, कोणाचं सूत जुळणार, कोण टास्क जिंकणार, कुठले आमनेसामने येणार. कोणामध्ये घट्ट मैत्री होणार आणि काय नवं पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक तयार आहेत.
घरात वाईल्ड कार्ड पकडून एकूण 16 स्पर्धकांचा समावेश असेल. या सीजनमध्ये स्पर्धकांना नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असणार आहे.