मुंबई : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून 'बिग बॉस' मराठीची ओळख आहे.  बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेतील कावेरी राजवर्धन म्हणजेच तन्वी मुंडले आणि विवेक सांगळे या जोडीने हजेरी लावली होती. त्यांच्या उपस्थितीत बिग बॉसने सदस्यांवर साप्ताहिक कार्य सोपवलं. या साप्ताहिक कार्यातील पहिले उपकार्य काल पार पडलं. या उपकार्यात टीम A विजेती ठरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसचा हा शो सर्वत्र लोकप्रिय आहे. यंदाचं बिग बॉसचे पर्व हे 'ऑल इज वेल' या थीमवर आधारित आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या दिवसांपासूनच बिग बॉसच्या घरात वाद, भांडण आणि गॉसिप्सला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सुरु आहे. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी समाजसेविका आणि गायिका अमृता फडणवीस येणार आहेत. नुकतंच याचा प्रोमो समोर आला आहे.


बिग बॉसच्या घरात मिसेस उपमुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीसांची एन्ट्री झाली. यावेळी अमृता फडणवीसांनी दिवाळी सण साजरा तर केलाच शिवाय 'कजरा रे' गाण्यावर डान्सही केला. अमृता फडणवसांनी बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही दिली.



याचबरोबर कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोत बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीस एंट्री करताना दिसत आहेत. यावेळी त्या घरातील सदस्यांबरोबर मजा मस्ती डान्स करताना दिसत आहेत. यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, जर मी बिग बॉसमध्ये आली असती तर मला बाहेर पडायची इच्छाच झाली नसती. हे फारच सुंदर आहे. अमृता फडणवीस यांच्यासमोर साप्ताहिक कार्य रंगलं. सध्या हा प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे. आजच्या भागातही आपल्याला पाहायला मिळेल. या भागात अमृता फडणवीस बिग बॉस मराठीच्या सदस्यांसोबत आनंद लुटताना दिसणार आहेत.