मुंबई : सेलिब्रिटी त्यांच्या फॅशन स्टाईलिंगमुळे नेहमीच चर्चेत असतात. कलाकारांनी केलेला प्रत्येक लूक हा चर्चेचा विषय ठरतो. चाहते आपल्या लाडक्या सेलब्रिटीची   स्टाईल फॉलो करत असतात.

 

बिग बॉसमध्ये झळकलेल्या अभिनेत्री निकी तंबोलीने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिने बिग बॉसच्या घरात आपल्या हटके अंदाजाने  सगळ्यांच लक्षवेधून घेतलं. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही निकी चांगलीच चर्चेत असते. तिच्या स्टाईलिंगची सध्या चांगलीच चलती आहे.

 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

A post shared by kappu (@kapilkarande_69)


अनेक इव्हेंटला फिट निकी तंबोलीचा अ‍ॅट्रॅक्टीव्ह लूक पाहायला मिळतो. नुकताच तिने केलेला एअरपोर्ट लूक देखील चांगलाच भाव खाऊन गेला. 


निकीला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी निकीने ब्लॅक कलराचा टू पीस ड्रेस घातला होता. ब्लॅक स्पोर्टस ब्रा आणि गुडघ्यापर्यंत स्कॅर्टमधील निकीवर  सगळ्यांच्याच नजरा अडकल्या. निकीने कॅप आणि मास्क देखील या ड्रेसला मॅचिंग असा घातला होता.

 

तिच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. निकीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.