मुंबई : आपल्या स्टाईल आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा एक बॅकलेस व्हिडिओ शेअर केला आहे. बिग बॉस ओटीटीनंतर उर्फी जावेद सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. उर्फी जावेदचे इन्स्टाग्रामवर 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच फॉलोअर्ससाठी ती दररोज वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते.


नुकताच शेअर केलेला एक व्हिडिओ पुन्हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उर्फीने पुन्हा एकदा तिचा बोल्ड अवतार दाखवून खळबळ उडवून दिली आहे. व्हिडिओ आणि फोटोमध्ये उर्फी बॅकलेस क्रॉप टॉपमध्ये दिसतेय. उर्फी जावेदच्या ड्रेसबद्दल बोलायचे तर ती फिकट जांभळ्या रंगाच्या क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये दिसली. ज्यामध्ये ती नेहमीच हॉट  दिसते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


उर्फीचा हा अवतार तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. या फोटोंना आतापर्यंत 66 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. यासोबतच जवळपास 1 हजार कमेंट्सही आल्या आहेत. या व्हिडिओपूर्वी उर्फीने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत साडीतील एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे.