`बाई आता कपडे न घालता फिर; म्हणत उर्फी जावेदवर कोण इतकं संतापलं?
बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद पुन्हा एकदा फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद पुन्हा एकदा फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यूजर्स तिच्या फोटोंवर कमेंट करत तिला ट्रोल करत आहेत. त्याचबरोबर काही यूजर्स तिच्या या लूकचं कौतुक करत आहेत.
रिवीलिंग स्कर्टलाउर्फी जावेदने लावला कट
उर्फीने यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे की, ती स्वतःचे कपडे स्वतः डिझाइन करते. अशा परिस्थितीत प्रत्येकवेळी तिच्या कपड्यांची रचना सोशल मीडियावर वेगळी छाप सोडते. दरवेळेप्रमाणेच यावेळीही बिग बॉस फेम जावेद उर्फी जावेदने तिचा ड्रेस अशाप्रकारे डिझाईन केला आहे की, फोटो पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. उर्फीच्या ड्रेसमधील कट आणि तिचा खुलून दिसणारा ड्रेस चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
Urfi Javed ने नाही परिधान केलं अंर्तवस्त्र
उर्फी जावेदचे लेटेस्ट फोटो पाहून फॅन्स हैराण होत आहेत. साईडने कट असलेल्या ड्रेसमध्ये उर्फी जावेदने अंर्तवस्त्र घातलेले नाही. उर्फीचा हा असा अवतार पाहून सगळ्यांच्याच हृद्याचे ठोके वाढवले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री थाई हाय स्लिट पिंक स्कर्टमध्ये दिसत आहे. त्यामुळे तिचा लूक खूपच बोल्ड दिसत आहे. उर्फी जावेदने रिव्हलिंग स्कर्टवर क्रॉप शर्ट घातला आहे. बिग बॉस फेम उर्फी जावेदने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला आहे या सगळ्यानंतर उर्फी जावेदचा लूक खूपच स्टनिंग दिसत आहे.
कमेंट्सचा वर्षाव
उर्फी जावेदच्या या फोटोंवर यूजर्स तिला ट्रोल करत आहेत आणि अभिनेत्रीची क्लास घेत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, तुमची ड्रेसिंग खूपच खराब आहे. तर आणखी एका यूजरने लिहिलं की, यापेक्षा बाई आता कपड्यांशिवाय फिर, उर्फी जावेदच्या फोटोंवर अशा नकारात्मक कमेंटचा वर्षाव होत आहे. युजर्सने Urfi ला ट्रोल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही उर्फीने असे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यानंतर ती युजर्सच्या निशाण्यावर राहिली आहे.