Bipasha Basu Delivery: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu)  आणि पती करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover)  लवकर आई-वडील होणार आहेत. काहीदिवसांपूर्वी बिपाशाने प्रेग्नेंसीचे फोटो शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. लग्नाच्या सहा वर्षांनंतर बिपाशा आणि करणने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान अनेकदा बिपाशा स्पॉट झाली. त्यामुळे बिपाशा आणि करणच्या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक आहे. (bipasha basu pregnant news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या बिपाशाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये बिपाशा कुल अंदाजात दिसत आहे. फोटो शेअर करत अभिनेत्रीने पती आणि अभिनेता करणाला हब्बी म्हणून टॅग केलं आहे. बिपाशा आणि करण सिंग आई-वडील होण्यासाठी खूप उत्सुक आहेत. (bipasha basu baby shower)



बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच आनंदाची बातमी सांगणार आहे. याच दरम्यान बिपाशा बसू तिच्या प्रेग्नेंसी पीरियडचा आनंद घेताना दिसत आहे.  तिच्या या फोटोंमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. 


लग्नानंतर 6 वर्षांनी पालक होणार 
बिपाशा आणि करण यांची पहिली भेट 2015 मध्ये चित्रपटाच्या सेटवर झाली होती. चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर करण आणि बिपाशाने एप्रिल 2016 मध्ये त्यांच्या नात्याचं लग्नात रुपांतर केलं. आता जवळपास 6 वर्षांच्या लग्नानंतर हे जोडपं पालक बनणार आहे.