मुंबई : मालदीव हे बॉलिवूड सेलेब्सचे आवडते हॉलिडे डेस्टिनेशन बनले आहे. हे पर्यटकांसाठी खुले होताच, बी-टाऊनमधील सेलिब्रिटींनी त्यांचा मूड रिफ्रेश करण्यासाठी मालदीवमध्ये वेळ घालवणं सुरू केले. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर, टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी, आधार जैन आणि तारा सुतारिया यांसारख्या अनेक सेलिब्रिटी जोडप्यांना अलीकडेच सुट्टीचा आनंद घेताना मालदीवमध्ये पाहिले गेले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता, बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोव्हर देखील मालदीवमध्ये पोहोचले आहेत. कालच त्यांनी सोबतचा एक फोटो शेअर केला, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. ही चर्चा गरम असतानाच बिपाशाने आणखी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.


मुंबईत दुर्गापूजा साजरी केल्यानंतर बिपाशा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी मालदीवमध्ये सुट्टीवर गेली आहे. ती सतत तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते.


सेक्सी पोल्का बिकिनीमध्ये बिपाशा


अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले, ज्यात ती पांढऱ्या पोल्का डॉट्ससह सेक्सी ब्लॅक बिकिनीमध्ये दिसत आहे. आपली ब्लॅक ब्यूटी फिगर शो करत बिपाशाने तिच्या सिझलिंग हॉट पोल्का डॉट बिकिनीमध्ये पोज दिले आहेत.


तिने मालदीवच्या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेत एक छोटी व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. परंतु सेलेब्रिटी, पोलका डॉट ड्रेस आणि प्रेग्नेन्सी हे समीकरण पाहाता बिपाशाच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, अभिनेत्रीला काही गुड न्यूज तर द्यायची नाही ना?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


बिपाशाने फोटो शेअर करताच तिच्या एका चाहत्याने तिच्या पोस्टवर कमेंट केली आणि लिहिले, 'सोन्यासारख्या आत्म्याचे हृदय आहे जे तुम्हाला सुंदर बनवते.' तर दुसऱ्याने लिहिले, 'सुंदर दृश्य.' करणने सोशल मीडियावर बिपाशासोबतचे काही हॉट फोटोही शेअर केले आहेत.


2016 मध्ये लग्न झाले


बिपाशा आणि करणचे लग्न 30 एप्रिल 2016 रोजी झाले. अनेकदा त्यांना मुलांबद्दल प्रश्न विचारले गेला. एकदा रेडिओ होस्ट सिद्धार्थ कन्ननसोबत बिपाशाच्या गर्भधारणेच्या अफवांविषयी बोलताना करण म्हणाला होता, "मी भिंतीवर डोके का मारू? ही एक स्वाभाविक गोष्ट आहे - लोक भेटतात, प्रेमात पडतात, लग्न करतात आणि नंतर एक मूल होते. पण, तुम्हाला काही काळ मूल नसेल तर काही फरक पडत नाही. लोक आधीच आमच्या कुटुंबाची योजना करत आहेत, म्हणून त्यांना योजना करू द्या. हरकत नाही."