Bipasha Basu Childhood Photos: सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. तेव्हा त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. इन्स्टाग्रामवर या अभिनेत्रीनं आपला फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी तिच्या या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली आहे. या अभिनेत्रीचं नावं हे जॉन अब्राहमशी जोडले गेले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे तिची बरीच चर्चा होती. परंतु त्यानंतर त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. जॉन अब्राहमची आता दुसरी एक गर्लफ्रेंड असून आता बिपाशा बासूचंही लग्न झालं आहे. सोबतच तिला एक लहान मुलगीदेखील आहे. आपल्या लेकीचे फोटोही ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. यावेळी तिनं आपल्या लहानपणीचा फोटो हा शेअर केला असून तिला यात ओळखणंही कठीण झालं आहे. 


ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे बिपाशा बासू. आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून तिनं आपल्या लहान बहीणीसोबतचा फोटो हा शेअर केला आहे. यावेळी तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिनं हा फोटो शेअर केला आहे. सध्या तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. फोटो शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''माझी पहिली डॉल (गुडिया). माझ्या लहानगीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपल्या वाढदिवशी खूप धम्माल कर. मी तूला खूप मिस करत आहे. लवकरच भेट मग तुला भेटेन. माझी मुलगी देवी तूला खूप मिस करते आहे. पहिल्या फोटोत तू अगदी देवीसारखी दिसते आहेस. किती जुळतो आपण सगळे!'' 


हेही वाचा : संसाराची तयारी; लग्नाआधी मराठमोळ्या कपलनं गुपचूप घेतलं आलिशान घर? नेमप्लेटमुळे चर्चांना उधाण



सध्या तिच्या या फोटोची फारच चर्चा आहे. तिनं आपल्या आणि आपल्या बहिणीचा आधीचा आणि आत्ताचा फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे यावेळी त्या दोघींची चांगलीच चर्चा आहे. बिपाशा बासूला लहान मुलगी देवीही आहे. बिपाशा आपल्या लेकीचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिनं मध्यंतरी आपल्या लेकीसाठी महागडी गाडीही विकत घेतली होती. करण सिंग ग्रोवरशी तिनं लग्न केले. तो एक लोकप्रिय अभिनेता आहे. करण सिंग ग्रोवरचे यापुर्वी जेनिफर विंगेटशी लग्न झाले होते.