मुंबई : बिपाशा बासु आणि करण सिंह ग्रोवरच्या लग्नाला ३० एप्रिलला 5 वर्ष पुर्ण होणार आहेत. यादरम्यान हे कपल पालक बनण्याच्या अफवा बऱ्याचदा उठल्या. आता पुन्हा एकदा बिपाशा बसूच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी जोर धरला आहे. जेव्हा अभिनेत्रीचं वजन वाढलं आणि बिपाशा सैल कपडे घातलताना स्पॉट झाली. यानंतर अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांनी जोर धरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणसोबत गेली डिनर डेटवर 
बिपाशा बसू नुकतीच मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर पती करण सिंग ग्रोव्हरसोबत दिसली. यावेळी बिपाशा आणि करण खूप खुश दिसत होते. अभिनेत्री कारमधून उतरताच सगळे कॅमेरे अचानक तिच्याकडे वळले. कारण यावेळी बिपाशाने खूप सैल कपडे घातले होते.


ओवरसाइज ड्रेस बनली अफवाचं कारण 
बिपाशाला या ड्रेसमध्ये पाहून तिच्या चाहत्यांनाही धक्काच बसला आहे. अभिनेत्री प्रेग्नंट आहे की नाही, असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आला, त्यामुळे तिने बेबीबंप लपवण्यासाठी असे सैल कपडे घातले असतील का? असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


चाहत्यांकडून व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव
बिपाशा बासू आणि करण रेस्टॉरंटच्या बाहेर दिसताच अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्या आहेत. सोशल मीडियावरही युजर्सनी प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली. एका यूजरने कमेंट करत लिहिलंय की, 'ती प्रेग्नंट आहे.' तर दुसर्‍या एका यूजरने कमेंट करत लिहिलंय की, 'बिपाशा मॅडम प्रेग्नंट आहे, कारण ती अनेक महिन्यांपासून असे सैल कपडे घालत आहे. जेणेकरून तिचा बेबी बंप दिसू नये.