मुंबई : बिपाशा बसूने आपल्या मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्रीचं वजन झपाट्याने वाढलं आहे. अभिनेत्रीचा बदलेला लूक पाहून सध्या चाहत्यांना धक्का बसत आहे. यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगची शिकारही व्हावं लागत आहे. मात्र नुकताच अभिनेत्रीने वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती जिममध्ये पायलेट्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने एक लांबलचक कॅप्शनही लिहिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिपाशाचा वर्कआउट व्हिडिओ
व्हिडिओमध्ये बिपाशा स्वत:वर खूप मेहनत घेताना दिसत आहे.  व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, आईचा वजन कमी करण्याचा प्रवास... खरंच खूप संघर्ष आहे, पण अशक्य काहीच नाही. हळू हळू आणि सर्वात निरोगी मार्गाने. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला माझ्या शरीरावर प्रेम आहे. स्वतःशी प्रामाणिकपणे वागण्याचा प्रयत्न करत आहे. मी नुकताच दुसर्‍या जीवाला जन्म दिला आहे याची आठवण करून देणं... हे स्वतःच एका महासत्तेसारखं आहे. निरोगी, आनंदी आई असल्याचा अभिमान आहे.


करण-बिपाशाची मुलगी 11 महिन्यांची झाली आहे
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांची मुलगी देवी हिचा जन्म १२ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. 2016 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या सहा वर्षानंतर या जोडप्याने आपल्या मुली या जगात स्वागत केलं. तेव्हापासून अभिनेत्री तिचा सर्व वेळ आपल्या मुलीसोबत घालवत आहे.



काही दिवसांपूर्वी बिपाशाने एका मुलाखतीत सांगितलं की, जन्माच्या वेळी देवीच्या हृदयात दोन छिद्रे होती. नेहा धुपियासोबत लाइव्ह चॅट दरम्यान बिपाशाने ही माहिती दिली. तिने असंही सांगितलं की तिच्या मुलीच्या जन्मानंतर अवघ्या तीन महिन्यांत ओपन हार्ट सर्जरी करावी लागली. हे ऑपरेशन सुमारे 6 तास चाललं. मात्र, देवी आता पूर्णपणे बरी आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


बिपाशा- करणचं वर्कफ्रंट
बिपाशा बसूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लग्नापासूनच चित्रपटांपासून दूर आहे. करण लवकरच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या एरियल अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'फायटर'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.