मुंबई : अब्बास दिग्दर्शित 2001 मध्ये प्रदर्शित झालेला 'अजनबी' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीची सुरुवात करणारी अभिनेत्री बिपाशा बसू नेहमीच चर्चेत असते. प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाईफमुळे लाइमलाइटमध्ये राहणारी बिपाशा तिच्या बोल्ड अवतारासाठीही प्रसिद्ध आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हर हे बॉलिवूडचं हॉट कपल मानलं जातं. दोघेही अनेकदा त्यांचे इंटिमेट आणि रोमँटिक फोटो शेअर करतात. लव्ह लाईफबद्दल नेहमीच उघडपणे बोलणाऱ्या या कपलने यावेळी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे जो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. कॅमेऱ्यासमोर बिपाशा बासूसोबत तिच्या पतीने असं कृत्य केलंय ज्यावर लोकं खूप प्रतिक्रिया देत आहेत.


बिपाशाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती फोनवर ट्रेंडिंग रील बनवत आहे. रीलमध्ये, तुम्हाला दिसेल की, हे कपल डोळे बंद करून स्थिर दिसत आहेत, नंतर अचानक दोघांचे डोळे उघडतात आणि मग करण सिंग ग्रोव्हर पत्नी बिपाशाला चाटू लागतो. रीलच्या पार्श्वभूमीवर बन्ना रे हे गाणे वाजत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा मजेदार आणि रोमँटिक रील शेअर करत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'त्याने माझी महागडी नाईट क्रीम खाल्ली'. या कपलच्या या स्टाइलला लोकांकडून खूप पसंती मिळत आहे आणि लोकं व्हिडिओवर खूप कमेंट करत आहेत.  हिंदी चित्रपटसृष्टीत बिपाशा बासूची जितकी चर्चा झाली त्याहून अधिक मीडियात तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. तिने 30 एप्रिल 2016 रोजी करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केलं.