sonu nigam birthday special : बॉलीवूडमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जुनी गाणी असतील किंवा नवीन गाणी, प्रत्येक गाण्यांची खासियत म्हणजे चाहत्यांना तिच तिच गाणी परत ऐकायला भाग पाडते. त्यातून गाण्यांना आवाज देणारा गायकही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतो. किशोर कुमार, आर डी बर्मन यांसारखी मंडळी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून आहेत याच पिढीतला असाच एक गायक आहे जोही आपल्या चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्गज गायक सोनू निगम त्याच्या गोड आवाजाने सर्वांनाच वेड लावतो. आज त्याचा 49 वा वाढदिवस आहे. 30 जुलै 1973 रोजी फरीदाबादमध्ये जन्मलेल्या सोनू निगमने खूप संघर्ष करून स्वत:ला इथपर्यंत आणले आहे. आपल्या आवाजाने करोडो लोकांची मने जिंकणारा आणि संगीताच्या दुनियेचा बादशाह सोनू निगम आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनू निगमची सुपरहिट गाणी प्रत्येकाने ऐकली असतीलच पण हे इतकं मोठं यश संपादन करण्यापुर्वी सोन निगम नक्की काय करत होता, त्याचा संघर्ष काय होता हे जाणून घेऊया. 


सोनूच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल तेव्हा आला जेव्हा त्याला 'सारेगामा' शो होस्ट करण्याची संधी मिळाली. हा शो 1995 साली प्रसारित झाला. त्यानंतर त्याची टी-सीरीजचे मालक गुलशन कुमार यांच्याशी भेट झाली आणि गुलशन कुमारने सोनूला 'बेवफा सनम' चित्रपटात गाण्याची संधी दिली. या चित्रपटात त्याने गायलेले 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का' हे गाणे खूप गाजले. 1997 मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटात त्याने गायलेले 'सांडसे आते हैं' हे गाणे सुपरहिट ठरले. 


वयाच्या 18 व्या वर्षी सोनू निगमचे वडील आपल्या सोनूसह मुंबईत पोहोचले. इथूनच सोनूने बॉलीवूड सिंगिंग करिअरला सुरुवात केली. सोनू निगमने उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. सोनू निगमला टी-सीरिजकडून 'रफी की यादों' या नावाने त्याने गायलेल्या गाण्यांचा अल्बम रिलीज करण्यात आला. त्याने 'जनम' या चित्रपटातून पार्श्वगायक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली पण हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यानंतर तब्बल 5 वर्षे playback singer होण्यासाठी त्यांनी संघर्ष केला.


आज सोनू निगमची गणना बॉलिवूडमधील बड्या गायकांमध्ये केली जाते पण एक काळ असा होता जेव्हा तो लग्नसोहळ्यात आपल्या वडिलांसोबत लग्नसोहळ्यात गाणे म्हणत असे. वयाच्या चौथ्या वर्षापासून सोनू निगमने वडील आगम निगम यांच्यासोबत स्टेज शो, पार्ट्या आणि लग्नसमारंभात गाणं गायला सुरूवात केली. सोनू निगम आज हा देशातील सर्वात श्रीमंत गायकांपैकी एक आहे. तो अनेक आलिशान गाड्यांचा आणि घरांचा मालक आहे. सोनू परदेशात कॉन्सर्टसाठी 10 ते 15 लाख रुपये घेतो. याशिवाय एका गाण्यासाठी तो जवळपास 5 कोटी रुपये घेतो.