नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरचा आज ३७ वा वाढदिवस आहे. बेबो या नावाने ती बॉलिवूड वर्तुळात प्रसिद्ध आहे. करिना कपूर ही रंधीर कपूर यांची छोटी मुलगी असून करिश्मा कपूर तिची मोठी बहीण आहे. करिनाने २००० मध्ये 'कहो ना प्यार है' या चित्रपटात हृतिकसोबत काम केले होते. मात्र मध्येच तिने हा चित्रपट सोडून दिला. त्यानंतर  'रेफ्यूजी' या चित्रपटातून तिने आपल्या करियरची सुरुवात केली. आणि पदार्पणातच तिला 'बेस्ट फिमेल डेब्यू' चा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मीडियाने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, करिनाने हावर्ड युनिव्हर्सिटीतून मायक्रोकॉम्प्युटर्समध्ये ३ महिन्यांचा कोर्स केला आहे. 'द ब्रिजेज ऑफ मैडिसन कंट्री', 'टायटॅनिक', 'कयामत से कयामत तक हैं' हे तिचे आवडते चित्रपट आहेत.



आपल्या फिटनेसबद्दल ती अत्यंत जागरूक असलेल्या करिनाला योगा करणे आवडते आणि ती नियमित योगसाधना करते. मधुर भंडारकर दिग्दर्शित 'हिरोईन' चित्रपटात तिने १३८ ड्रेसेज घातले होते. 



त्याचबरोबर करिनाने देव चित्रपटात गाणे गायले आहे. तिला लेखनकला देखील अवगत आहे. तिने एक पुस्तक लिहिले असून त्याचे नाव, करिना कपूर : द स्टाइल डायरी ऑफ अ बॉलिवूड दिवा, असे आहे. 



आतापर्यंत करिनाला ५ फिल्म फेयर पुरस्कार मिळाले आहेत.