मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा आज ३६ वा वाढदिवस आहे. अमेरिकन सिंगर निक जोनससोबतच्या अफेअरमुळे प्रियंका सध्या चर्चेत आहे. दोघांच्या रोमांटिक डेटचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इतकंच नाही तर निकने भारतात येऊन प्रियंकाच्या कुटुंबियांशी भेट घेतली होती. निकसोबतच्या रिलेशनपूर्वी प्रियंकाचे या ५ अभिनेत्यांसोबत अफेअर होते. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या या अफेअर्सबद्दल...


शाहरुख खान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉन सिनेमाच्या शूटिंगदरम्यान प्रियंका आणि शाहरुखमधील जवळीक वाढली होती. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले होते. पण गौरी खानला याची खबर लागताच. तिने शाहरुखला प्रियंकापासून दूर राहण्याची तंबी दिली. त्यानंतर शाहरुखने प्रियंकापासून दूर राहणेच पसंत केले. त्यानंतर त्यांनी एकमेकांशी संबंध तोडले. इतकंच नाही अनेक प्रसंगी त्यांनी एकमेकांना दुर्लक्षितही केले.


अक्षय कुमार


प्रियंकाचे नाव बॉलिवूडच्या खिलाडी कुमारशीही जोडले गेले आहे. अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्राने अंदाज, मुझसे शादी करोगी, ऐतराज आणि वक्तःरेस अगेंस्ट टाईम यांसारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे. त्यामुळेच की काय या दोघांची जवळीक इतकी वाढली की अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने प्रियंकासोबत काम करण्यास अक्षयला मनाई केली.


हरमन बावेजा


लव्ह स्टोरी 2050 मधून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणाऱ्या हरमन बावेजासोबत देखील प्रियंकाचे अफेअर असल्याची चर्चा होती. काही प्रसंगात त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आले होते. पण हा सिनेमा पूर्णपणे फसला आणि प्रियंका हरमनपासून दूर गेली.


शाहीद कपूर


प्रियंका आणि शाहीदने मीडियासमोर अनेकदा आम्ही एकमेकांचे फक्त चांगले को-स्टार असल्याचे सांगितले. पण ते दोघे दीर्घ काळ एकमेकांना डेट करत होते. 


गेरार्ड बटलर


हॉलीवूड अभिनेता गेरार्ड बटलरसोबतही प्रियंकाचे नाव जोडले गेले. बटलर जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी सेटवर जावून प्रियंकाची भेट घेतली होती. भारतात त हॉटेलमध्ये नाही तर प्रियंकाच्या घरी राहिले होते. या दोघांचे अफेअर चांगलेच चर्चेत होते.