बर्थडे स्पेशल : कुशल बद्रिकेची लव्हस्टोरी तुम्हाला माहित आहे का?
प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि आपल्या हटके डान्स स्टाईलमुळे लोकप्रिय असलेला अभिनेता कुशल बद्रिकेचा आज वाढदिवस आहे.
मुंबई : चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि आपल्या हटके डान्स स्टाईलमुळे लोकप्रिय असलेला अभिनेता कुशल बद्रिकेचा आज वाढदिवस आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याची लव्हस्टोरी...
कुशलची पत्नी सुनैना कथ्थक नृत्यांगणा आहे. ३० एप्रिल २००९ मध्ये कुशल-सुनैना विवाहबद्ध झाले. आता लग्नाला ९ वर्ष पूर्ण झाली असून त्यांना एक मुलगा आहे. प्रेमविवाह केलेल्या या जोडप्याचा प्रेम ते लग्न हा प्रवास काही सहज सोपा नव्हता. सिनेमाप्रमाणेच त्यांच्याही आयुष्यात काही ट्वीस्ट आले. मग अखेर शेवट गोट कसा झाला...?
तेव्हा तिला पहिल्यांदा पाहिले
अंबरनाथ येथील एका कॉलेजमध्ये कुशल शिकत होता. तेव्हा खुल्या एकपात्री अभिनय स्पर्धेत त्याचे नाव जबरदस्तीने घालण्यात आले. तोपर्यंत कुशलने ५०-६० एकपात्री स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. तिथे सिद्धार्थ जाधवनेही परफॉर्मन्स दिला होता. त्यानंतर एका मुलीने ‘ती फुलराणी’मधला एक पॅच सादर केला होता. ते काम कुशलला भयंकर आवडले आणि त्यासाठी सुनयनाला उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक आणि कुशलला पहिलं पारितोषिक मिळालं होतं.
मग इंप्रेस होत गेला
त्यानंतर एका एकांकिका स्पर्धेत डोंबिवलीच्या एका ग्रुपने कुशलला कामासाठी विचारले आणि कुशलने पटकन होकार दिला. त्या एकांकिका स्पर्धेत सुनैना कुशलची बायको होती. तेव्हा त्यांच चांगलं ट्युनिंग जमलं. नंतर एकांकिकेत सुनयनाला सातत्याने मिळणाऱ्या बक्षीसांमुळे कुशल तिच्यावर इंप्रेस होत गेला.
अन् प्रेम बहरत गेले
पण एकदा गडकरी रंगायतनला प्रयोग सुरु असताना कुशल विंगेत पडला आणि त्याचे दात तुटले. त्या अपघातामुळे सुनैना त्याची खूप काळजी करु लागली व तेथूनच त्यांच्यात प्रेम बहरत गेले.
तिनेच विचारले...
पण कुशलने कधीही सुनैनाला तसं विचारायची हिंमत केली नाही. कारण त्याच्या मनात संकोच होता. एकतर चाळीत राहत असल्यामुळे आणि दिसायला अगदीच सामान्य असल्यामुळे तसं विचारायचं कधी धाडस केलं नाही. पण सुनयनाने पुढाकार घेऊन तिला विचारलं आणि कुशलने होकार दिला.
तिची साथ पण घरच्यांचा विरोध
सुनैना प्रत्येक गोष्टीत, परिस्थितीत साथ देत असली तरी घरच्यांचा मात्र लग्नाला विरोध होता. त्यामुळे लग्न देखील सहज झालं नाही.
तरीही ठाम राहत केले लग्न
सुनैनाच्या घरुन लग्नासाठी विरोध होता. कारण नट, आर्टिस्ट घर कसं सांभाळणार? असा प्रश्न होता. आणि सुनैना खूप हुशार होती. तिचे वडील ब्रँच मॅनेजर तर आई शाळेत मुख्याध्यापिका होती. त्यामुळे घरातून विरोध झाला. पण सुनयना ठामपणे उभी राहिली आणि त्यांचे लग्न झाले.