सलमान खानने याकारणामुळे रणबीरला दिली कानाखाली
काय आहे यामागचं खरं कारण
मुंबई : बॉलिवूडचा सर्वात हँडसम हिरो रणबीर कपूरचा आज वाढदिवस. रणबीर अगदी आपल्या सिनेमांपासून ते अगदी अफेअरपर्यंत तो कायमच चर्चेत राहिला आहे. रणबीर कपूरचं नाव अनेक लोकप्रिय अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. मात्र असं असलं तरीही तो अजून सिंगल आहे.
या अगोदर रणबीर कपूर कतरिनाला डेट करत होता. कतरिनाने सलमान खानसोबत ब्रेकअप केल्यानंतर तिने रणबीरला डेट करण सुरू केलं होतं. यानंतर मात्र सलमान आणि रणबीरमधलं वातावरण तापलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमानला असं वाटतं होतं की, रणबीरने कतरिनाला आपल्यापासून वेगळं केलं आहे.
हल्लीच आता रणबीर आणि कतरिनाचं ब्रेकअप झालं. मात्र असं असलं तरीही रणबीर आणि सलमान अजूनही एकमेकांशी बोलत नाही. एक गोष्ट या दोघांमधली अजूनही गुपित आहे ती म्हणजे एका पार्टीत सलमान खानने रणबीर कपूरला कानाखाली लगावली होती.
ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा रणबीर कपूरने फिल्म इंडस्ट्रीत काम करायला सुरूवात नव्हती केली. तेव्हा सलमानचं बॉलिवूडमध्ये चांगल नाव होतं. एका पब पार्टीमध्ये हे दोघं एकमेकांना भेटले. पार्टीमध्ये या दोघांच कोणत्यातरी कारणांवरून वाद झाला आणि गोष्ट एवढी वाढली की एकमेकांना खूप काही बोलू लागले. दोघांनाही त्यांच्या मित्र परिवाराने रोखण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत सलमान इतका रागात होता की त्याने रणबीरच्या कानाखाली दिली. मग रणबीर रागात पार्टी सोडून गेला.