मुंबई : जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज २९ वा वाढदिवस आहे. ८ ऑगस्ट १९८९ रोजी पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात प्राजक्ताचा जन्म झाला. तिची आई गृहीणी तर वडील पोलिस दलात आहेत. मालिकेनंतर नाटक आणि आता सिनेमातून प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हंप्पी नंतर पार्टी हा तिचा सिनेमा येऊ घातला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# प्राजक्ताची ओशोंवर भयंकर श्रद्धा आहे. त्यामुळे जगण्याची प्रेरणा देत राहील असा टॅटू म्हणजेच ओशोंचा नावाचा टॅटू मनगटावर काढला आहे. 


# पुण्यातील ललित कला केंद्रातून प्राजक्ताने शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर ती भरतनाट्यम् नृत्यांगणा आहे. तिने काही दिवस नृत्यदिग्दर्शिका म्हणूनही काम केले आहे.


# कला क्षेत्रात कोणीही नसताना फक्त आईच्या प्रेरणेने ती या क्षेत्रात आल्याचे प्राजक्ताने सांगितले. आईला कला क्षेत्राची खूप आवड होती. आईने दिलेला पाठिंबा आणि प्रेरणेमुळेच मी या क्षेत्रात काम करत असल्याचे प्राजक्ता म्हणते. 


# २००७ मध्ये दिग्दर्शक संजय सुरकर यांच्या 'तांदळा एक मुखवटा' या सिनेमातून प्राजक्ताने सिनेसृष्टीत पर्दापण केले. त्यानंतर तिने स्मिता तळवलकर यांच्या सुवासिनी मालिकेत सावीची भूमिका साकारली आणि त्यामुळेच ती प्रकाशझोतात आली.


# संधी मिळाली तर राजकारणातही येण्याची इच्छा असल्याचे, प्राजक्ताने सांगितले. त्याचबरोबर नृत्याची प्रचंड आवड असल्याने त्यात तिला पीएच.डी करायचीही तिची इच्छा आहे. 


# छोट्या पडद्यावरील 'गुडमॉर्निंग महाराष्ट्र', 'गाणे तुमचे आमचे', 'सुगरण', 'फिरूनी नवीन जन्मेन मी' या कार्यक्रमांमध्ये ती झळकली. 


# त्यानंतर केदार शिंदेच्या खो-खो सिनेमात तिने काम केले.


# झी मराठीवरील लोकप्रिय मालिका जुळून येती रेशमीगाठी आणि नकटीच्या लग्नाला यायंचं हं यामुळे ती घराघरात पोहचली. 


# प्राजक्ताचे प्लेझंट सरप्राईज हे नाटकही चांगलेच गाजले.


# आता पार्टी या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येईल.