मुंबई : साऊथचा सुपरस्टार नागार्जुनचा आज वाढदिवस आहे. नागार्जुन अभिनेता असण्यासोबतच निर्माता आणि बिजनेजमन देखील आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात राज्य करणाऱ्या या अभिनेत्याच्या संपत्ती आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तर वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही खास गोष्टी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# साऊथ सिनेमांशिवाय बॉलिवूडमध्येही नागार्जुनने आपले नशीब आजमावले आहे. पण खास गोष्टी ही की, त्याच्या अभिनयाचा शिक्का दोन्हीकडे खणखणीत वाजला. त्याचबरोबर त्याचे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. माहितीनुसार, हैद्राबादच्या जुबली हिल्समध्ये नागार्जुनचा सुमारे ४० कोटींचा बंगला आहे. 


# त्याशिवाय नागार्जुन अन्नपूर्णा स्टुडिओ प्रॉडक्शन कंपनीचा मालक आहे. हा स्टुडिओ सुमारे ७ एकरच्या आवारात उभारलेला आहे. त्याचबरोबर तो हैद्राबादच्या अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कुल ऑफ फिल्म अँड मीडियाचा अध्यक्ष आहे. इतकंच नाही तर एमएनएन रियलिटी इंटरप्राइजेजचा फाऊंडिग पार्टनर देखील आहे. 


# नागार्जुनकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्या आहेत. यात रोल्स रॉयस, बेंटले, बीएमडब्लू, रेंज रोवर आणि पोर्शे यांचा समावेश आहे. नागार्जुनची एकूण संपत्ती ३००० कोटी इतकी आहे. नागार्जुनने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. १९६७ साली आलेल्या 'सुदिगुंदालु' सिनेमातून त्याने पर्दापण केले होते. विशेष म्हणजे या सिनेमात नागार्जुनचे वडील नागेश्वरा प्रमुख भूमिकेत होते.


# नागार्जुनचे दोन विवाह झाले आहेत. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्याने नागार्जुनने अमला अक्किनेनीसोबत विवाह केला. त्याचबरोबर अभिनेत्री तब्बूसोबत नागार्जुनचे अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती. पण नागार्जुन विवाहीत असल्याने दोघांनी लग्न केले नाही. पण तब्बू नागार्जुनवर अत्यंत मनापासून प्रेम करत होती आणि त्यामुळेच तिने आतापर्यंत लग्न केले नाही, असे बोलले जाते.