नवी दिल्ली : 'पद्मावती' सिनेमावरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याचा निर्णय घेत नाहीये. या वादामुळे सिनेमा प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.


भाजप नेत्याने केलं वादग्रस्त वक्तव्य 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा शिरच्छेद करणाऱ्यास १० कोटी रुपये देऊ आणि त्याच्या कुटुंबाचीही काळजी घेऊ असं म्हणणाऱ्या भाजप नेता सुरज पाल यांनी आता आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 


शुर्पणकासोबत झालेलं विसरू नका


'पद्मावती' सिनेमाचं समर्थन करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सुरज पाल अमू यांनी हल्लाबोल केला आहे. शुर्पणकासोबत काय झालं होतं हे विसरू नका असं सुरज पाल अमू यांनी ममता बॅनर्जींना म्हटलं आहे. 


राक्षसी प्रवृत्तीच्या शुर्पणका


सुरज पाल अमू हे 'पद्मावती' सिनेमाचा सुरुवातीपासूनच विरोध करत आहेत. "राक्षसी प्रवृत्तीच्या शुर्पणका सारख्या महिला असतात, शुर्पणकेला लक्ष्मणाने धडा शिकवला होता. ममता बॅनर्जींनी हे विसरू नये" असं वक्तव्य सुरज पाल अमू यांनी केलं आहे. 



'पद्मावती' सिनेमाचं समर्थन 


ममता बॅनर्जी यांनी 'पद्मावती' सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि त्यांच्या टीमला राज्यात आमंत्रित करणार असल्याचं सांगितलं होतं. इतकंच नाही तर 'पद्मावती' सिनेमाच्या प्रीमिअरसाठी आणि प्रदर्शनासाठी विशेष बंदोबस्त करणार असल्याचंही ममता बॅनर्जी म्हटलं आहे.