मुंबई : झी टीव्हीवर सुरु होणारी 'एक मां जो लाखों के लिए या मालिकेत भूमिका करणारी अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे. एका भूमिकेसाठी ज्या अभिनेत्रीला फायनल करण्यात आलं आहे ती अभिनेत्री भाजपची महिला नेता आहे. सोनाली सिंह भाजपच्या राष्ट्रीय अनुसूचित जनजाती मोर्चाची प्रवक्ता आहे. या शोमध्ये सोनाली नवाब शाहच्या पत्नीची भूमिका करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत पाकिस्तान फाळणीवर आधारीत या शोचा ५२ वा एपिसोड दाखवला जाणार आहे. हा शो जीनत नावाच्या महिलेवर आधारीत आहे. जीनतचा पती तिला आणि तिच्या मुलांना सो़डून निघून जातो.  सोनाली सिंह याआधी देखील टीव्हीवर झळकली आहे. सोनाली सिंह दूरदर्शन हरियाणासाठी अँकरिंग देखील करायची.


सोनाली हरियाणाची राहणारी आहे. मागच्या ८ वर्षापासून भाजपची कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. दिल्ली, पंजाब, चंडीगड आणि हरियाणाची जबाबदारी सोनालीकडे आहे. सोनालीचं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न होतं.