जोधपूर एअरपोर्टवर तब्बसोबत फॅनचं गैरवर्तन
२० वर्षांपासून कोर्टात सुरू असलेलं चर्चित काळवीट शिकार प्रकरणात आज सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. याच सुनावणीसाठी कोर्टामध्ये दाखल होत असलेल्या अभिनेत्री तब्बूसोबत एअरपोर्टवर एका फॅननं गैरवर्तन केलं. यामुळे तब्बूला चांगलाच धक्का बरला.
नवी दिल्ली : २० वर्षांपासून कोर्टात सुरू असलेलं चर्चित काळवीट शिकार प्रकरणात आज सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. याच सुनावणीसाठी कोर्टामध्ये दाखल होत असलेल्या अभिनेत्री तब्बूसोबत एअरपोर्टवर एका फॅननं गैरवर्तन केलं. यामुळे तब्बूला चांगलाच धक्का बरला.
मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूर एअरपोर्टवर अभिनेत्री तब्बूसोबत एका फॅननं गैरवर्तन केल्यानंतर तब्बूच्या बाऊन्सर्सनं या फॅनला तिथून पिटाळून लावलं.
एक फॅन तब्बूच्या सिक्युरिटी गार्डचं सुरक्षा कवच तोडून जबरदस्तीनं आत घुसला होता.... आणि एअरपोर्टवरच त्यानं अभिनेत्रीशी गैरवर्तन सुरू केलं. हे लक्षात आल्यानंतर बाऊन्सर्सनं या फॅनला तिथून हाकललं.
या प्रकरणी अद्याप तब्बूकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. परंतु, या घटनेचा मोठा धक्का तिला बसलाय.
उल्लेखनीय म्हणजे, १९९८ मध्ये जोधपूरमध्ये 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सलमान खानवर काळवीटची शिकार करण्याचा आरोप होता. या प्रकरणात सलमानसोबत सैफ अली खान, अभिनेत्री निलम, सोनाली आणि तब्बू हे देखील आरोपी होते. मात्र, कोर्टानं त्यांची निर्दोष मुक्तता केलीय.