Sholay : प्रसिद्ध दिग्गज अभिनेते संजीव कुमार यांचा उल्लेख केव्हाही होतो. 1975 मध्ये 'शोले'मध्ये ठाकूरची भूमिका साकारून त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. जेव्हा हा ब्लॉकबस्टर चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपटाने एकच खळबळ उडवून दिली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि अमजद खान यांच्या या चित्रपटात ठाकूरची भूमिका साकारून संजीव कुमार यांनी इतिहास रचला होता. 'शोले' चित्रपटातील प्रत्येक पात्राला लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील संजीव कुमार यांची ठाकूरची भूमिका आणि अमजद खान यांची गब्बरची भूमिका आजही लोक विसरू शकलेले नाहीत. त्यावेळी रमेश सिप्पी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'शोले'  चित्रपट हा ब्लॉकबस्टर सुपरहिट ठरला.


ब्लॅक तिकीटं विकणारे मालामाल


ज्यावेळी हा चित्रपट थियटरमध्ये प्रदर्शित झाला त्यावेळी या चित्रपटाच्या तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चित्रपटाचे तिकीट खरेदी करणे म्हणजे लोकांसाठी युद्ध जिंकल्यासारखे झाले होते. या चित्रपटाची अनेक तिकिटे ही त्यावेळी ब्लॅकनं विकण्यात आली. 


70 च्या दशकात अनेक चित्रपटांची तिकिटे ब्लॅकनं विकली जात होती. त्यावेळी ब्लॅकमध्ये तिकीट विकणाऱ्यांची चांदी झाली होती. निर्मात्यांसोबतच तिकीट विक्रेत्यांनीही 'शोले' चित्रपटामधून भरपूर कमाई केली. 'शोले' हा चित्रपट त्यावेळी जवळपास वर्षभर थिएटरमध्ये चालू होता.


बॉलिवूडमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे रेकॉर्ड


रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर शोले 2-3 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत. बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा 'शोले' हा चित्रपट आहे.  या चित्रपटाने 35 कोटींची कमाई केली होती. इतकेच नाही तर या चित्रपटाचा 20 वर्षांचा विक्रम अन्य कोणताही चित्रपट मोडू शकला नाही. आजही चाहते शोलेचे गुणगान करताना थकत नाहीत.