मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरलाय. सलमानसाठी जोधपूर न्यायालयाचा हा धक्कादायक निकाल आहे. सलमानला १ ते ६ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९८ साली काळवीट शिकार केल्याप्रकरणी सलमान खानला जोधपूरच्या ग्रामीण न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आलंय.  राजस्थानात केलेल्या काळवीट शिकार प्रकरणामध्ये न्यायालयाचा निकाल आला आहे. आता यात सलमानला किती शिक्षा होते की कमी शिक्षा होऊन तो जामिनावर बाहेर याकडे येतो, याकडे लक्ष आहे. मात्र यानिमित्तानं सलमान पुन्हा एकदा वादासाठी चर्चेत आलाय.


सलमान खानला जर ३ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याला जामीन मिळणार नाही. मात्र, ३ वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाली तर त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा होणार आहे. सलमान दोषी ठरल्यानंतर त्याला किती शिक्षा होणार याकडे लक्ष लागले.


जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य कलाकार निर्दोष मुक्तता करण्यात आलेय. काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान याला जोधपूरमधील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मात्र, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान या निर्दोष ठरविण्यात आलेय. आता काय शिक्षा होणार याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.


वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची सलमानने शिकार केली होती.निकालाच्यावेळी सलमान याच्यासह सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे  उपस्थित होते. या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल  करण्यात आला होता.