मुंबई | अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याबाहेर संरक्षक भिंतीवर लगेच हातोडा पडणार नसल्याचं स्पष्ट झालंय. संरक्षक भिंत काढण्यासाठी १ महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे. महिन्य़ाभरात बच्चन यांनी स्वत:हून जागा न दिल्यास पालिका कारवाई करून जागा ताब्यात घेणार आहे. बच्चन यांचा शेजारी असलेल्या के.व्ही.सत्यमुर्ती यांच्या इमारतीची संरक्षक भिंत बीएमसीनं काढल्यानंतर आता अमिताभ बच्चन यांना भिंत काढण्यासाठी सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुहू येथील ईस्ट वेस्ट मार्ग म्हणजेच संत ज्ञानेश्वर मार्ग ६० फूट रूंद करण्यासाठी प्रतिक्षा बंगल्याबाहेरील ८ ते १० फूट जागा घेतली जात आहे. याबदल्यात अमिताभ बच्चन यांना मुंबई महापालिका टीडीआर देणार आहे. बच्चन यांना मार्च २०१८ मध्ये नोटीस देण्यात आल्यानं पालिका पुन्हा नोटीस देणार नाही.