मुंबई : कोरोनाचा उद्रेक वाढत असताना (Corona Positive) सेलिब्रिटी देखील कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचं सरकारकडून आवाहन केलं जात असतानाही बॉलिवूड अभिनेत्रीकडून कोरोना नियम (BMC file FIR against Bollywood Actress ) मोडत असल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेकडून कोविड पॉझिटीव्ह बॉलिवूड अभिनेत्रीविरोधात ओशिवरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अभिनेत्रीकडे मुंबई आणि दिल्लीतील कोविडचे दोन वेगवेगळे रिपोर्ट आढळले आहेत. 


११ मार्चचा मुंबईतील रिपोर्ट पॉझिटीव्ह असतांना १२ मार्चचा दिल्लीतील निगेटीव्ह रिपोर्ट दाखवून अभिनेत्री बाहेर फिरत असल्याचे उघड झाले आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना बाहेर फिरणं हा गुन्हा आहे. कोरोनाचे दिलेले नियम मोडल्यामुळे अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 



मुंबईतील रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असतानाही अभिनेत्रीने दिल्लीचा प्रवास केला आहे. त्याचप्रमाणे दिल्लीचा कोविड निगेटीव्हचा खोटा रिपोर्ट दाखवला याबाबत तपास सुरु आहे. रिपोर्ट पॉझिटीव्ह असतांना देखील ओशिवरा भागात बाहेर फिरत होती. स्थानिकांनी याबाबत तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल झाला आहे.(कोरोनाबाधित असतानाही बाहेरगावी जाण्याची धडपड; गुन्हा दाखल)


या अगोदर खार येथे राहणाऱ्या कुटुंबियानी जयपूरचा विमान प्रवास करता यावा म्हणून कोरोनाचा खोटो निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून घेतला. या कुटुंबातील तिघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. राज्यातील जनतेसाठी चिंतेची बाब समोर येतेय. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा उसळी घेतोय. इथलं कोरोनाचं प्रमाण सरासरी १३ टक्क्यांवर गेलंय. त्यामुळे नागरिकांनी राज्य सरकारचे नियम गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झालीय. राज्यात रविवारी 16 हजार 620 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. अकोल्यात सर्वाधिक रुग्ण आढळतायत. त्याखालोखाल जळगाव, यवतमाळ, बुलढाणास नागपूर, वर्ध्यात जास्त रुग्ण आढळलेयत.