मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या नंतर त्यांच्या दोन्हीही मुलांनी सनी  आणि बॉबी देओल यांनी सिनेसृष्टीत पर्दापण केले. त्यानंतर आता देओल परिवाराची तिसरी पिढीही बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यातच सध्या बॉबी देओलचा मुलगा आर्यमन चर्चेत आहे. आर्यमनचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तो अगदी आजोबा धर्मेंद्रसारखा दिसत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.


ब्लॅक सूटमधील हा हॅंडसम आहे तरी कोण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिकडेच बॅंकॉक येथे झालेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात बॉबी देओलने तब्बल ७ वर्षांनंतर कमबॅक केले आहे. या सोहळ्यात त्याच्या परिवाराने उपस्थिती लावली होती. तेव्हा बॉबी देओलचा मुलगा आर्यमन प्रकाशझोतात आला. आयफा पुरस्कार सोहळ्यातील त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या फोटोत तो ब्लॅक सूटमध्ये अगदी हॅंडसम दिसत आहे. लाईमलाईटपासून दूर राहणारा आर्यमन यावेळेस मात्र मीडियाचे कॅमेरे चुकवू शकला नाही. आर्यमन १६ वर्षांचा असून सध्या शिकत आहे. पण त्याचा गुड लूक्स त्याला आजोबा-वडीलांकडून वारसाने मिळाले आहेत, असे बोलणे वावगे ठरणार नाही.



बॉबी देओलचा धमाकेदार कमबॅक


सलमान खानच्या रेस ३ सिनेमातून बॉबी देओलने धमाकेदार कमबॅक केले आहे.