Bold Web Series : या वेब सीरीज पाहाणार असाल तर एकट्यातच पाहा, नाहीतर...
चित्रपटांपेक्षा अधिक लोक शो, चित्रपट आणि वेब सिरीज इत्यादींची OTT वर प्रदर्शित होण्याची वाट पाहतात. याचं एक कारण हे देखील आहे की, OTT वर लोकांना त्यांच्या भाषेनुसार आणि आवडीनुसार वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, मालिका पाहयला मिळतात.
मुंबई : लॉकडाऊननंतर लोकांचा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे कल वाढला आहे. चित्रपटांपेक्षा अधिक लोक शो, चित्रपट आणि वेब सिरीज इत्यादींची OTT वर प्रदर्शित होण्याची वाट पाहतात. याचं एक कारण हे देखील आहे की, OTT वर लोकांना त्यांच्या भाषेनुसार आणि आवडीनुसार वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, मालिका पाहयला मिळतात.
जरी असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत, ज्यावर ठळक सामग्री संपूर्णपणे दिली जाते. अशा काही वेब सिरीज आहेत, ज्यात खूप बोल्ड सीन्स आहेत आणि त्या OTT प्लॅटफॉर्म MX Player वर मोफत उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया या बोल्ड वेब सीरीजची यादी.
'मस्त राम'
MX Player वरील फ्री वेब सिरीजबद्दल बोलायचं झालं तर 'मस्तराम' मध्ये अनेक बोल्ड सीन्स देखील दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे ही सिरीज तुम्हाला बघायची असेल तर एकट्याने बघा. या वेब सीरिजच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या अभिनेत्री दिसल्या आहेत. मस्तराम ही एका लेखकाची कथा आहे जो आपल्या काल्पनिक कथांमध्ये हॉटनेसने भरलेली पात्रे विणतो.
'हॅलो मिनी'
'हॅलो मिनी' ही सर्वात लोकप्रिय सिरीजपैकी एक आहे जी MX Player वर मोफत उपलब्ध आहे. या सिरीजमध्ये जबरदस्त बोल्ड सीन्स देण्यात आले आहेत. तुम्हाला सस्पेन्स जॉनरची आवड असली तरी ही सिरीज तुमच्या मनोरंजनासाठी उत्तम ठरू शकते. मात्र, जास्त बोल्ड सीन्समुळे ती तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पाहू शकत नाही.
'डॅमेज'
एमएक्स प्लेयरवर रिलीज झालेल्या या वेब सीरिजमध्ये सस्पेन्ससोबत बोल्डनेसची भर पडली आहे. अमृता खानविलकर आणि करीम हाजी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या वेब सीरिजमध्ये निर्मात्यांनी अतिशय बोल्ड सीन्स सादर केले आहेत.
'मोंटू पायलट'
बोल्ड सीन्सने भरलेल्या वेब सीरिजच्या यादीत मॉन्टी पायलट ही वेब सीरीज देखील समाविष्ट आहे. ही सिरीज मुळात बंगाली भाषेत बनलेली असली तरी तिचं हिंदी डब व्हर्जनही अस्तित्वात आहे.
'पेइंग गेस्ट'
या वेब सिरीजचे आतापर्यंत तीन सीझन रिलीज झाले आहेत. ही देखील अशीच एक सिरीज आहे जी MX Player वर मोफत उपलब्ध आहे. मात्र, बोल्ड सीन्स असल्यामुळे कुटुंबासोबत तुम्हाला ही वेबसिरीज पाहता येणार नाही.