मुंबई : बॉलिवूडचे 'शहंशाह' अमिताभ बच्चन यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. इतकच नाही तर बॉलिवूडकरांकडून देखील प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ट्विटरवर सेलिब्रिटींकडून बीग बींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकार जावडेकर यांनी ट्विटरवर याची घोषणा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता अनिल कपूर यांनी म्हटलं की, या लेजंड शिवाय भारतीय सिनेमांचा उल्लेखच होऊ शकत नाही. त्यांना प्रत्येक भूमिकेसह सिनेमाला वेगळं वळण दिलं आहे. आणि त्यांच्या असंख्य योगदानासाठी ते प्रशंसेचे हकदार आहेत. शुभेच्छा !



करण जोहर म्हणतो की, 'भारतीय सिनेमातील सर्वात प्रेरणादायक लेजंड!! ते रॉकस्‍टार आहेत. मला खूप गौरव वाटत आहे की मी अमिताभ बच्चन यांच्या युगात आहे.'



केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.