शपथ तुला आहे.... एका वचनाखातर 41 वर्षे हेमा मालिनी यांनी नाही केलं `ते` काम
त्यांना काहीजणांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता.
मुंबई : 'ड्रीम गर्ल' म्हणून हिंदी चित्रपट जगतामध्ये गेली कित्येक दशकं ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या खासगी आयुष्यानं कायमच सर्वांच्य़ा नजरा वळवल्या. अभिनय आणि नृत्यकलेत पारंगत असणाऱ्या या अभिनेत्रीनं रुपेरी पडद्यावरील दमदार अभिनेता धर्मेंद्र यांच्याशी लग्नगाठ बांधली. पण, या लग्नासाठी त्यांना काहीजणांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता.
खुद्द हेमा मालिनी यांच्या आईचाही या लग्नासाठी विरोध होता. त्यामागे एक कारणंही होतं. ते कारण म्हणजे धर्मेंद्र यांचं विवाहित असणं. लग्न करेन तर, धर्मेंद्र यांच्याशीच असं हेमा मालिनी यांनी ठरवलं होतं. पण, त्यांच्या या निर्णयाला वडिलांची साथ मिळाली नाही. असं असलं तरीही अखेर आईचं मन लेकीच्या हट्टापुढे नमलं. पण, तेसुद्धा एका अटीवर.
मुलीकडून एक वचन घेत हेमा मालिनी यांच्या आईनं लग्नासाठी होकार दिला होता. लग्नासाठी घरातल्यांकडून स्थळांचे पर्याय समोर येऊ लागले, तेव्हाच हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याबाबत घरात कल्पना दिली होती. पण, धर्मेंद्र आधीच विवाहित असल्यामुळं आपल्या मुलीनं कोणाच्याही संसारात आडकाठी आणणं त्यांना पटत नव्हतं. अखेर मुलीच्या हट्टानं आईलं मन पाघळलं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नासाठी आईनं एक अट ठेवली. आपल्या मुलीनं कधीही धर्मेंद्र यांच्या पहिल्या संसारामध्ये आडकाठी आणायची नाही, हीच ती अट. धर्मेंद्र यांच्या पहिल्या नात्यात आणि त्यांच्या कुटुंबात हेमा यांनी कोणतीही अडवणूक करायची नाही, असं वचन त्यांनी घेतलं.
आईला दिलेल्या वचनाखातर लग्नानंतर कित्येक वर्षे उलटूनही हेमा त्यांच्या शब्दाला जागल्या. धर्मेंद्र यांच्यासोबतच्या वैवाहिक नात्यात त्यांना 41 वर्षे झाली, पण यादरम्यान, त्या एका वचनाखातर हेमा मालिनी यांनी पतीच्या पहिल्या लग्नात, त्यांच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही.