अगं थांब! बोल्ड प्रेयसीपेक्षा अर्जुनच्या डोक्याला बहिणीचा ताप, कॅमेरासमोरच Inners...
मुख्य म्हणजे हे कारण खुद्द अर्जुनलाही धक्का देऊ शकतं.
Anshula Kapoor Bra Removing Video: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याचं संपूर्ण कुटुंब कायमच चर्चेत असतं. या न त्या कारणानं अर्जुन, त्याची बहीण आणि त्याचे कुटुंबीय कमाल चर्चेत असतात. पण, आता मात्र त्याच्या बहिणीची एका विचित्र कारणामुळे चर्चा होत आहे. मुख्य म्हणजे हे कारण खुद्द अर्जुनलाही धक्का देऊ शकतं.
अर्जुन डेट करत असणाऱ्या मलायका अरोरा हिच्याहूनही बोल्ड होणारी त्याची बहीण, अंशुलाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं कारण ठरत आहे अंशुलाचं एक कृत्य. तिचा सडपातळ होण्यापर्यंतचा प्रवास असो किंवा मग कलाजगतात वावरण्याचा अंदाज, अंशुला हल्ली समोर आली, की नजरा वळतातच.
यावेळी तिनं चक्क अंतर्वस्त्र काढत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. रविवारच्या दिवशी बाहेरून घरी आल्यानंतरचा सर्वोत्तम क्षण म्हणजे...., असं कॅप्शन लिहित तिनं चक्क कॅमेरासमोरच इनर्स काढण्यास सुरुवात केली आहे.
#NoBraClub असं लिहित तिनं अंतर्वस्त्रे काढली आणि तिच्या या व्हिडीओसह कॅप्शननंही नेटकऱ्यांचं मन जिंकलं. बऱ्याच तरुणींनी तिच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आपल्याही मनातील भावना व्यक्त केल्या.
प्रत्येक वेळी नीटनेटकं दिसण्यासाठी म्हणून तरुणी म्हणा किंवा महिला म्हणा जे कपडे घालतात, त्यामध्ये शरीराला त्रासदायक असतानाही त्यांना Inners चं ओझं सोबत बाळगावं लागतं. कितीही नाकारलं तरी ही बाब नजरेआड करता येण्याजोगी नाही.
अद्यापही न्यूनगंडाचा विषय असणाऱ्या या मुद्द्यावर अंशुलानं अनोख्या अंदाजात तिची भूमिका स्पष्ट करत पोस्ट केलेला हा व्हिडीओ पाहून तुम्ही काय म्हणाल?