Bollywodd Actress Shruti Haasan: बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. साऊथ चित्रपटांपासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली दरम्यान ती आता बॉलिवूडमध्ये सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. कमल हसनच्या लाडक्याला लेकीचा देशभरात प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. पण अलीकडेच या फॅन फॉलोइंगमुळे ती नाराज झाल्याचे दिसले. श्रुती हासनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती एका चाहत्यावर रागावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत आहे. नेमकी काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रुती हसनचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ समोर आला आहे. तिचा एक चाहता तिला कसा फॉलो करत होता हे त्यातून दिसत आहे. यानंतर श्रुतीने त्या चाहत्याची तक्रार केली आणि तिच्या सुरक्षेसाठी अनेक लोक जमा झाले.


श्रुती हासनच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ती ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये श्रुतीच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत आहे. त्रासलेल्या अवस्थेत ती इकडे तिकडे पाहत आहे. तिच्या त्रासाचे कारण एक वेडा चाहता आहे. 


हा व्यक्ती खूप दिवसांपासून तिला फॉलो करत आहे. श्रुतीला हे अजिबात आवडले नाही आणि ती विमानतळावर या व्यक्तीबद्दल सर्वांना सांगताना दिसत आहे. आणि एक प्रकारे ती सर्वांकडून मदत मागताना दिसली. व्हायरल होत असलेल्या श्रुती हासनचा हा व्हिडिओ पहा.



या व्हिडीओमध्ये श्रुती इतकी घाबरली की तिचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीपासून वाचण्यासाठी तिने आपला रस्ता बदलला. पण या वेड्या चाहत्याला अजूनही हे लक्षात आले नाही. शेवटी कारजवळ जाताना श्रुतीचा राग अनावर झाला. 


ही व्यक्ती अभिनेत्रीच्या समोर आली आणि अभिनेत्रीने मागे सरकत त्याला विचारले, 'तू कोण आहेस?' यानंतर सुरक्षारक्षक पुढे आले आणि त्यांनी प्रकरण हाताळले. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीला या वेड्या चाहत्याविरोधात तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे.