मुंबई : 2020 साली उदयास आलेलं कोरोना वादळ अद्यापही शमलेलं नाही. नव्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढलं आहे. यावेळी वर्षाच्या सुरूवातीलाचं बॉलिवूडकरांना कोरोनाने वेढलं आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ज्यामध्ये 6 प्रसिद्ध जोड्या आहेत. काही जोडप्यांनी कोरोनावर मात केली आहे तर, काही सध्या उपचार घेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


 


जॉन अब्राहम - प्रिया रुंचाल




जॉन आणि पत्नी प्रिया दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. जॉनने सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना झाल्याचं सांगितलं. तो म्हणाला, 'तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. नंतर कळालं तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर आम्ही कोरोना चाचणी केल्यानंतर आम्हाला देखील काळलं आम्हाला कोरोनाची लागण झाली आहे...'


प्रेम चोप्रा – उमा चोप्रा




इंडस्ट्रीतील दिग्गज प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या दोघांवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अर्जुन कपूर - मलाइका अरोरा




अर्जुन कपूरची कोविड-19 चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली आहे. 2020 मध्ये देखील अभिनेत्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. े त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मलायका अरोरा देखील कोविड पॉझिटिव्ह होती.


विक्की कौशल - कतरिना कैफ 




गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफचे लग्न झाले होते. मात्र, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दोन दिवसांच्या अंतराने या दोन्ही सिलेब्रिटींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.


अभिषेक बच्चन - ऐश्वर्या राय बच्चन




जुलै 2020 मध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोनाचे बळी ठरले. ऐश्वर्या काही दिवसांत बरी झाली, तर अभिषेकची कोरोना चाचणी जवळपास महिनाभरानंतर निगेटिव्ह आली.