लेक आयरा खान विवाहबंधनात अडकल्यानंतर आईची भावूक पोस्ट, आमिरचा फोटो पोस्ट करत म्हणाली...
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट असलेल्या आमिर खानची मुलगी आयरा खान विवाहबंधनात अडकली. लेकीच्या लग्नानंतर आता तिची आई रिना दत्ता यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
Reena Datta Emotional Post : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट असलेल्या आमिर खानची मुलगी आयरा खान विवाहबंधनात अडकली. आयरा खानने तिचा मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. आयरा आणि नुपूर शासकीय पद्धतीने विवाहबद्ध झाले. त्यानंतर त्या दोघांनी उदयपुरमधील ताज हॉटेलमध्ये थाटामाटात लग्न केले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लेकीच्या लग्नानंतर आता तिची आई रिना दत्ता यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नानंतर आता दोन्हीही कुटुंब मुंबईत परतली आहेत. लेक आयरा विवाहबंधनात अडकल्यानंतर आता तिची आई रिना दत्ताने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी रिना दत्ता यांनी तिच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत नुपूर तिचे वडील आमिर खानसोबत नाचताना दिसत आहे. त्यावेळी रिना दत्ता या नुपूरच्या मागे उभ्या असल्याचे दिसत आहेत.
आयरा खानने दिली प्रतिक्रिया
या फोटोला त्यांनी भावूक कॅप्शन दिले आहे. "मी कायम तुझ्या पाठिशी असेन, माझी मुलगी आयरा खान. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे", असे त्यांनी ही पोस्ट करताना म्हटले आहे. आईच्या या पोस्टवर आयरा खाननेही कमेंट केली आहे. "आई आय लव्ह यू, मला याची पूर्णपणे खात्री आहे, त्यामुळेच मी स्वत:ला सुरक्षित समजते", अशी प्रतिक्रिया आयराने दिली आहे. तर जावई नुपूरनेही हार्ट इमोजी पोस्ट करत यावर कमेंट केली आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी आमिर खाननेही लेकीच्या लग्नाबद्दल भावूक प्रतिक्रिया दिली होती. "सध्या माझ्या भावना या सनईप्रमाणे आहेत. एखाद्या लग्नसभारंभात सनई वाजवली जाते, त्या सनईची एक खास गोष्ट आहे. ती सनई तुम्हाला थोडंसं सुख आणि थोडं दु:ख या दोन्हीही गोष्टी एकत्र देते. त्यामुळे सनईमध्ये दोन्हीही भावनांचे मिश्रण असते. तशाच काहीशा आता माझ्या भावना आहेत", असे आमिर खानने म्हटले होते.
दरम्यान आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारीला मुंबईत रजिस्टर लग्न केले. त्यानंतर 7 जानेवारीला उदयपुरमध्ये मोठ्या थाटात ते लग्नबंधनात अडकले. याआधी हळद, मेहंदी, संगीत यांसारख्या कार्यक्रम पार पडले होते. यानंतर आज 13 जानेवारीला मुंबईत खास बॉलिवूड कलाकारांसाठी एका रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला अनेक राजकीय, बॉलिवूड कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.