मुंबई : दार उघड बये.... दार उघड... असं म्हणत महाराष्ट्रातील गृहिणींच्या घरोघरी जाऊन अभिनेते आदेश बांदेकर यांनी या गृलक्ष्मींचा सन्मान केला. पाहता पाहता आदेश बांदेकर हे सगळ्यांचेच लाडके 'आदेश भावोजी' झाले. आपल्या माणसांनी आपल्या माणसांना दिलेलं हे प्रेमाचं नाव होतं. बॉलिवूडमधला एक अभिनेताही काही वर्षांपूर्वी करिनासाठी आदेश भावोजी झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तो नेमकं का आणि कसा या रुपात आला, याबद्दलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून त्याचं हे करण्यामागचा हेतू सर्वांची मनं जिंकत आहे. 


करिनाला खास अशी चंदेरी सिल्कची साडी देणारा हा अभिनेता होता आमिर खान. (Aamir Khan Kareena Kapoor)


आमिर आणि करिनाच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाचं चित्रीकरण हल्लीकडेच पूर्ण झालं. पण, त्यांचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ त्याहीपूर्वीचा असल्याचं कळत आहे. 


जिथं आमिर साडेसहा हजार रुपयांच्या एका सुरेख साडीसाठी चक्क पंचवीस हजार रुपये मोजताना दिसत आहे. 


त्यानं असं नेमकं का केलं, हे व्हिडीओ पाहताना लक्षात येत आहे. आणि त्याचा हा निर्णय सर्वांचीच वाहवा मिळवून जात आहे. 


हातमागावर विणलेली एक चंदेरी साडी आमिर करिनाला भेट स्वरुपात देतो. करिनाच्या सांगण्यानुसार ती सात तासांचा प्रवास करुन त्या ठिकाणी पोहोचली. 


निमित्त एकच होतं, ती ज्या व्यक्तीला भेटणार होती, तो व्यक्ती होता आमिर खान. 


जेव्हा खुद्द आमिर आणि करिनाही तेथे पोहोचली तेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या हातमाग कामगारांची कला पाहून ते नि:शब्द झाले. 



अंधाऱ्या ठिकाणी 12 ते 15 तास काम करणाऱ्या या कामगारांना दिवसाचे अवघ्ये 50 रुपये मजुरी मिळते हे जाणून घेतल्यावर आमिरनं त्या साडीच्या मुळ किंमतीच्या तिपटीहून जास्त किंमत त्यांना दिली. 


गरजवंतांना मदत करत त्यांच्या कलेला आणि मेहनतीला केलेल्या त्याचा हा सलाम तिथं असणाऱ्या प्रत्येकाचीच मनं जिंकून गेला.