मुंबई : अभिनेता आमिर खान, यानं कायमच त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'अंदाज अपना अपना'पासून ते अगदी 'पीके'पर्यंत, प्रत्येक चित्रपटातून तो वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला. (aamir khan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कित्येक दशकं आमिरनं ही चित्रपटसृष्टी गाजवली. पण आता एक वळण असं आलं, जेव्हा आमिरचा या कलाजगताचाच कंटाळा आला. 


हल्लीच झालेल्या एका कार्यक्रमात त्यानं आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील मोठा खुलासा केला. एका वळणावर आपण चित्रपटसृष्टी सोडण्याचाच विचार करत असल्याचं त्यानं सर्वांसमोर सांगितलं. 


'मला असं वाटत होतं की मी स्वार्थी झालो आहे, सर्वकाही सोडून मी फक्त माझ्याच कामाला लागलो आहे. आपण आपल्या कुटुंबालाही वेळ देऊ शकत नाही असंही वाटलं आणि याच कारणामुळं मी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला', असं आमिर म्हणाला. 


अभिनेता झालो तेव्हा वाटलं की कुटुंबाची मला साथ असेल, मी सर्वकाही फार हलक्य़ात घेत होतो. तेव्हा मला जाणीव झाली की गेल्या 30-35 वर्षांपासून मी हे असंच करत आलो आहे... हा विचार त्याच्या मनात आला. 


हे तेच वळण होतं जेव्हा आपण स्वार्थी झाल्याची भावना त्याच्या मनात घर करुन गेली. आपण कुटुंबाला पुरेसा वेळ दिला नसल्याची जाणीव त्याला 57 वर्षांच्या वयात झाली. 


हेच आणखी उशिरा झालं असतं तर ही चूक सुधारता आलीच नसती, असं आमिर म्हणाला. 


चित्रपटांनी आपल्याला आपल्या कुटुंबापासून दूर केल्याच्या भावनेने आमिरच्या मनात घर केलं आणि याचवेळी अभिनय , चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय त्यानं घेतला. 


मुलं, रिना आणि किरण, त्या दोघींची कुटुंब यांना त्याला वेळ द्यायचा होता. पण, त्याच्या या निर्णयाने कुटुंबही थक्क झालं होतं. त्याचा हा निर्णय किरणला भावनांच्या दरीत लोटून गेला. 


कुटुंबीयांनी त्याचा हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं. चित्रपट माझ्या रक्तात असल्याचं सांगत दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर मात्र आपण परत नव्या जोमानं या कलाजगतात आल्याचं आमिरनं सांगितलं.