तिरुवअनंतपूरम: हल्लीच अभिनेता अजय देवगन याचा एक वेगळा लूक सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला होता. या लूकमध्ये अजय (Ajay Devgn) कपाळावर टिळा, गळ्यात रुद्राक्षांची माळ अशा रुपात दिसत होता. तो या रुपात समोर येताच ही 'शिवाय 2' चित्रपटाची तयारी की काय, असेच तर्क चाहत्यांनी लावले. पण, त्याच्या या रुपामागचं खरं कारण फार वेगळं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजयच्या या रुपामागचं आणि महिन्याभरापासून तो जगत असणाऱ्या खडतर आयुष्यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. 


बुधवारी म्हणजेच 12 जानेवारी 2022 ला अजय केरळमधील सबरीमला येथे अयप्पा स्वामी मंदिरात पूजाअर्चेसाठी पोहोचला होता.


मंदिरात दर्शनाला येण्याआधी अजयनं सर्व पूजा नियम आणि उपवास पूर्ण केल्याचं सांगितलं गेलं. 


अयप्पा स्वामींच्या दर्शनासाठी येताना त्यानं काळी वस्त्र परिधान केली होती. शिवाय डोक्यावर अरुमुदी केत्तु घेत तो मंदिरात आला. 


दर्शनानंतर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून अजयचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. 


सूत्रांच्या माहितीनुसार साधारण गेल्या एक महिना किंवा त्याहून जास्त काळापासून अजयनं बऱ्याच गोष्टींचं काटेकोर पालन केलं होतं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)


काळ्या रंगाचे कपडे घालण्याला तो प्राधान्य देत होता. असं म्हटलं जातं की त्यानं नखं आणि केसही कापले नव्हते, दाढीही केली नव्हती. 



अजयकडून हे सर्व करण्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, पूजाविधी आणि मंदिरातील दर्शनानंतर तो लगेचच कामासाठी रवाना झाल्याचं पाहायला मिळालं.