Akshay Kumar Injured: बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) जखमी झाला आहे. 'बडे मियाँ, छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) चित्रपटाच्या सेटवर टायगर श्रॉफसह (Tiger Shroff) अॅक्शन सीन शूट करत असताना अक्षय कुमार जखमी झाला आहे. स्कॉटलंडमध्ये (Scotland)या चित्रपटाचं शुटिंग सुरु आहे. अली अब्बार जफर (Ali Abbas Zafar) या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान ही जखम जास्त गंभीर नसून अक्षयने पुन्हा शुटिंगला सुरुवात केली असल्याची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमार हा सर्व स्टंट स्वत: करत असतो. तो अजिबात बॉडी डबलचा वापर करत नाही. अशाच प्रकारे 'बडे मियाँ, छोटे मियाँ' चित्रपटाच्या सेटवर अक्षय कुमार टायगर श्रॉफसह अॅक्शन सीन शूट करताना गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान त्याची जखम जास्त गंभीर असून गुडघ्यावर ब्रेसेस लावण्यात आले आहेत. 


सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित अॅक्शन सीन सध्या थांबवण्यात आला आहे. दोन्ही अभिनेत्यांची क्लोज शॉट घेत हा सीन शूट केला जात आहे. स्कॉटलंडमधील शुटिंग वेळेत संपावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 


'बडे मियाँ, छोटे मियाँ'ची निर्मिती जॅकी भगनानीच्या पूजा एंटरटेनमेंटकडून केली जात आहे. आपल्याला हॉलिवडूच्या Fast and Furious चित्रपटांना उत्तर देणारा एक चित्रपट बनवायचं असल्याचं निर्मात्यांनी म्हटलं होत. "जेव्हा बडे मियाँ, छोटे मियाँ चित्रपटाचा प्रश्न येतो, तेव्हा मला भारताचे हॉब्स आणि शॉ बनवायचे आहेत. हा चित्रपट मला मोठ्या स्तरावर बनवायचा आहे. फक्त प्लॉट नाही तर भूमिकाही विनोद असल्या पाहिजेत," असं त्याने सांगितलं होतं. 


अली अब्बास जफर दिग्दर्शनासाठी तयार होण्याआधीच अक्षयला या चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं. "मी अक्षय सरांकडे गेलो असता, त्यांना स्क्रिप्ट आवडली. त्यांनी मला छोटे मियाँ कोण असेल असं विचारलं असता मी टायगर असं उत्तर दिलं. दोन्ही अभिनेते तयार झाल्यानंतर आम्ही अली अब्बार जफर यांच्याकडे गेलो," असं जॅकीने सांगितलं होतं.


अली अब्बास जफरने या चित्रपटाचा आणि अमिताभ बच्चन-गोविंदा यांच्या 'बडे मियाँ, छोटे मियाँ' चित्रपटाशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारनही मुख्य भूमिकेत आहेत. डिसेंबर 2023 हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.