मुंबई : आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटाबाबत कलाविश्वात चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. 'अतरंगी  रे' असं त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. ज्यामध्ये अभिनेता अक्षय कुमार, दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि अभिनेत्री सारा अली खान अशी स्टारकास्ट झळकणार आहे. या चित्रपटाची घोषणा आणि फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आल्या क्षणापासूनच त्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता अभिनेता अक्षय कुमारच्या मानधनाचा आकडा आता अनेकांना थक्क करुन जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटात धनुष आणि सारा हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर, खिलाडी कुमारच्या भूमिकेवरुन मात्र अद्यापही पडदा उचलण्यात आलेला नाही. असं असलं तरीही या चित्रपटात तो कॅमिओ साकारताना दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे. या कॅमिओसाठी त्याला तब्बल 27 कोटी रुपये इतकं इतकं घसघशीत मानधन देणयात आल्याचं म्हटलं जात आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार 9 हा अक्षय कुमारचा भाग्यांक अर्थात लकी नंबर आहे. त्यामुळं बेरीज करुन हा आकडाच (2+7=9) त्यानं इथंही मानधनाच्या स्वरुपात घेतला असल्याचं पाहायला मिळत आहे. 


 


हा प्रत्येकाच्या समजुतींचा भाग असला तरीही खिलाडी कुमार मात्र अनेकदा 9 याच आकड्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतं. इतकंच नव्हे, तर तो चित्रीकरणादरम्यान एका दिवसाचे एक कोटी रुपये आकारतो असंही म्हटलं जात आहे. पण, 'अतरंगी रे'साठी मात्र त्यानं जवळपास दुपटीनं मानधन आकारल्याची चर्चा आहे.