मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिनं तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत उल्लेखनीय उंची गाठली आहे. फार कमी वयात तिनं भल्याभल्यांना लाजवणारं काम केलं. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आलिया इतकी मोठी झाली की, तिच्याकडे पाहताना तिच्या वडिलांनाही सार्थ अभिमान वाटतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी ही आलिया तिच्या कुटुंबाशी एका घट्ट नात्यात जोडली गेली आहे. हे नातं नेमकं कसं आहे याची प्रचिती आलियाच्याच सोशल मीडिया अकाऊंटवरून मिळते. 


दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या कुटुंबात जन्मलेली आलिया लहानपणापासूनच चुणूकदार होती. वडिलांवर तर तिचा विशेष जीव. 


एका मुलाखतीदरम्यान खुद्द महेश भट्ट यांनीच यासंदर्भातली एक आठवण सांगितली होती. 


तिची ही आठवण म्हणजे वडिल आणि मुलीचं नातं असंही असतं, याचीच प्रचिती देऊन गेली. 


लहान असताना आलिया अवघ्या 500 रुपय़ांसाठी माझ्या पायाला क्रीम लाऊन द्यायची. पण, आज तिनं मेहनतीच्या बळावर जितका पैसा कमवला आहे, तितका तर मी 50 वर्षांच्या आयुष्यातही कमवला नसता, असं ते म्हणाले. 


मुलीच्या यशापुढे आपण काय, सगळंकाही ठेंगणं अशीच भावना यावेळी एक वडील म्हणून भट्ट यांच्या मनात घर करुन गेली होती. 


सूत्रांच्या माहितीनुसार आलिया सध्या 165 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिच्याकडे स्वत:ची 3 घरं आणि बऱ्याच महागड्या कारही आहेत. 


आजच्या घडीला आलिया सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. यात तिच्या वडिलांनी ठेवलेला विश्वासही तितकाच महत्त्वाचा. 


आहे की नाही, बाप लेकिची ही स़ॉलिड टीम?