मुंबई: द बार काऊन्सिल ऑफ दिल्लीतर्फे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, एव्हरेस्ट मसाला, युट्यूब आणि संबंधीत मीडिया हाऊसला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका जाहिरातीमध्ये वकिलाचा पेहराव चुकीच्या पद्धतीने वापरला गेल्यामुळे त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान, वकिलाचा पेहराव वापरतेवेळी काही गोष्टींची काळजी घेण्यात असमर्थ ठरल्यामुळे आणि कोणत्याही परवानगीशिवाय जाहिरात प्रसारित केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं या नोटीसमध्ये म्हटलं गेलं आहे. 


'अशा प्रकारची जाहिरात ताबडतोब थांबवा आणि बार काऊन्सिल ऑफ दिल्ली, बार काऊन्सिल ऑफ इंडिया आणि इतरही बार काऊन्सिलकडे हमीपत्र देत यापुढे भविष्यात चुकीच्या पद्धतीने वकिलाचा पेहराव वापरणार नाही असं स्पष्ट करण्याचं या नोटीसमध्ये म्हटलं गेलं आहे. 


एव्हरेस्टच्या पावभाजी मसाल्याच्या जाहिरातीत बिग बींनी हा पेहरावर घातला होता. त्यामुळेच ते अडचणीत आले आहेत. 


बिग बींनी देण्यात आलेली ही नोटीस पाहता येत्या दहा दिवसांमध्ये त्यांनी सदर प्रकरणी उत्तर देणं अपेक्षित असून, तसं न केल्यास पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांना देण्यात आला आहे.