मुंबई: अभिनेता, दिग्दर्शक अरबाज खान याच्यासोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर अभिनेत्री, मॉडेल मलायका अरोरा खान हिचं नाव अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत जोडलं गेलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला या अफवा वाटल्या. पण, काही दिवसांनी विविध कार्यक्रमांना या दोघांची एकत्र उपस्थिती बरंच काही सांगून जात होती.


मलायका आणि अर्जुन यांचं नातं पाहता प्रेम करण्यासाठी वयाची किंवा इतर कशाचीच मर्यादा नसते हेच स्पष्ट होत आहे. या सुरेख भावनेची  चाहूल मलायका आणि अर्जुनला लागली असली तरीही त्या दोघांपैकी कोणीही या नात्याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. 


काही दिवसांपूर्वी मलायकाने आपण अरबाजसोबतच्या नात्यातून वेगळं झाल्यानंतर नेमकं कसं आयुष्य जगत आहोत याचा खुलासा केला होता. 


ज्यानंतर आता अर्जुन आणि मलायकाची चर्चा होतेय ती म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही फोटोंमुळे. ज्या फोटोंमध्ये ते एकाच कारमधून जात असल्याचं पाहायला मिळत आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेलिब्रिटी फॅशन डिझायनर संदीप खोसला यांनी आयोजित केलेल्या एका पार्टीतून निघाल्यानंतर हे दोघंही एकाच कारने गेल्याचं पाहायला मिळालं. 


मुख्य म्हणजे यावेळी मलायका माध्यमांना टाळण्याचा बराच प्रयत्नही करताना दिसली. येत्या काळात ही जोडी त्यांच्या नात्याचा स्वीकार करणार का, हे जाणून घेण्याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.