मुंबई : सेलिब्रिटींचं आयुष्य रुपेरी पडद्यावर जितकं अनोखं आणि हेवा वाटणारं असतं, अगदी तसंच आयुष्य ते खऱ्या जीवनातही जगत असतात असं नाही. अनेकदा रुपेरी पडद्यावर गाजणाऱ्या या कलाकारांच्या आयुष्यातही असे काही प्रसंग येतात जेव्हा त्यांना परिस्थितीपुढे हतबल व्हावं लागतं. अभिनेता अर्जुन कपूरच्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग आले. पण प्रत्येक वेळी त्याने एक मुलगा आणि भाऊ म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन त्याची भूमिका बजावत असतानाही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी असणारं त्याचं नातं आणि त्यांच्या काही कौटुंबीक गोष्टींच्या मुद्द्यावरुन त्याच्यावर निशाणा साधला गेला. नुकतच सोशल मीडियावर याची पुनरावृत्तीही झाली. जेथे एका युजरने अर्जुन आणि श्रीदेवी यांच्या नात्यात असणाऱ्या दुराव्याकडे सर्वाचं लक्ष वेधलं. 


तू तुझ्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीचा द्वेष केलास कारण, त्यांनी तुझ्य़ा आईची साथ सोडली होती आणि आता तू एका अशा महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये आहेस, जी तुझ्याहून ११ वर्षांनी मोठी आणि आणि तिला एक तरुण मुलगाही आहे. ही अशी दुहेरी भूमिका का?', असं ट्विट करत अर्जुमसमोर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. 



आपल्याविषयी करण्यात आलेल्या या ट्विटचं अर्जुनने मोठ्या समंजसपणे उत्तर दिलं. मी कोणाचाही द्वेष केलेला नाही. आम्ही फक्त एकमेकांमध्ये काही अंतर ठेवलं होतं. जर मी असं केलं असतं (त्यांचा राग केला असता), तर अतिशय संवेदनशील प्रसंगात जान्हवी, खुशी आणि बाबांना आधार देण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो नसतो', असं अर्जुन म्हणाला. एखादी ओळ टाईप करुन अमुक एका व्यक्तीविषयी पूर्वग्रह ठेवणं फार सोपं आहे. पण, तरीही थोडा विचार करा हा मोलाचा सल्ला त्याने  ट्विटर युजरला दिला. 



अर्जुनविषयी ट्विट करणाऱ्या त्या युजरला चाहत्यांनी चांगलंच निशाण्यावर धरलं. ज्यानंतर त्याच अकाऊंटवरुन आणखी एक ट्विट करण्यात आलं, ज्यामध्ये जाहीर माफी मागण्यात आली होती. अर्जुननेही या माफीनाम्याचा स्वीकार करत मोठ्या मनाने त्या युजरला क्षणा केली.