मुंबई : काही वर्षांपूर्वी अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana ) याची मुख्य भूमिका असणारा 'विकी डोनर' (vicky donor) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि एक वेगळीच संकल्पना अनेकांनी पहिल्यांदाच पाहिली. तिच्याविषयी जाणून घेतलं. ही संकल्पना होती स्पर्म डोनर किंवा स्पर्म डोनेशनविषयीची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुष्माननं या चित्रपटात साकारलेली दिल्लीच्या तरुणाची भूमिका सर्वांची मनं जिंकून गेली. कथानकाची जोड असल्यामुळं अतिशय संवेदनशील मुद्दा या चित्रपटातून तितक्याच सुरेखपणे हाताळला गेला. 


आता एकाएकी या चित्रपटाची चर्चा सुरु असण्याचं कारण म्हणजे एका अशा अभिनेत्याचं नाव समोर येत आहे, ज्यानं प्रत्यक्ष आयुष्यात स्पर्म डोनेट केले होते. दोन मुलं असणाऱ्या या अभिनेत्यानं असं नेमकं का आणि कधी केलं याचा खुलासा त्यानं स्वत:च केला. त्याचं नाव आहे, आयुष्मान खुराना. (Bollywood Actor Ayushmann Khurrana once donated sperms in real life )



Guess Who: कोण आहे 'ही' Cute मुलगी? जिच्या प्रेमात आहे अख्खं साऊथ... जाणून घ्या


आयुष्माननं जी भूमिका मोठ्या पडद्यावर साकारली, ते काम त्यानं प्रत्यक्षातही केलं होतं. जे सांगताना तो म्हणाला, 'मी 2004 मध्ये MTV Roadies season 2 जिंकलो. जेव्हा मी तिथे स्पर्धक होतो तेव्हा एक टास्क देण्यात आलं होतं. अलाहबादमध्ये त्यावेळी स्पर्म डोनेशन कॅम्प लागला होता. तिथं मी स्पर्म डोनेट केले होते'. प्रत्यक्षातही आपण स्पर्म डोनेशनसाठी ऑडिशन दिली, असं विनोदी अंदाजात म्हणत त्यानं पहिल्यांदाच एका मुलाखतीदरम्यान ही बाब जगासमोर आणली होती.