मुंबई : सलग सुपरहिट चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अभिनेता आयुष्यमान खुराना यानं आगामी काळात चित्रपटांपासून दूर राहत, इतर काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाला प्राधान्य देणं, चित्रपटांच्या स्क्रीप्ट वाचणं, स्वयंपाक शिकणं अशा गोष्टींसाठी वेळ देणार असल्याचं त्यानं सांगितलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यांपूर्वी घेतलेला हाच निर्णय आयुष्मानला आता महागात पडत असल्याचं कळत आहे. मागील दोन महिन्यांपासून आयुष्मान घरीच आहे. तो आतदाही तिच कामं करत आहे, जी त्याने चित्रपटांपासून विश्रांती घेत हाती घेतली होती. एका अर्थी त्याची ही सुट्टी अनपेक्षितरित्या वाढली आहे. त्यामुळे आता ही अनपेक्षित रजा त्याला डोईजड झाल्याचं कळत आहे. 


मागील वर्षी आयुष्मानने एका कार्यक्रमात आपल्या कारकिर्दीविषयी लक्षवेधी वक्तव्य केलं होतं. गेल्या सात वर्षांपासून आपण सातत्याने कामच करत आलो आहोत. त्यामुळं येत्या काळात काहीशी उसंत घेत पुढे कोणत्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करायचं आहे, याचा विचार कराययचा आहे असं म्हणत त्यानं कुटुंबासमवेच वेळ व्यतीत करण्यावरही भर दिला होता. 


२०२० हे पूर्ण वर्ष माझ्या कुटुंबासाठीचं आहे, असं नकळत म्हणणाऱ्या आयुष्मानला सद्यपरिस्थितीचा अंदाजही नसावा. पण, आता मात्र त्याला आपली ही इच्छा बरंच काही शिकवून गेल्याचं वास्तव पाहायला मिळत आहे. कारण, हल्लीच एका मित्राशी संवाद साधताना त्यानं एक सुरेख आणि तितकंच लक्षवेधी वक्तव्य केलं. 'सुट्ट्यांची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा त्या निर्धारित वेळेत संपतात. मला ठाऊक असतं की लॉकडाऊनच्या कारणानं मला इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी घरीच थांबावं लागेल', तर मी काही कामातून इतकी मोठी विश्रांती घेतलीच नसती, असं तो म्हणाला होता. 


 


आपण व्यक्त केलेली एक इच्छा आणि त्यामध्ये परिस्थितीमुळे झालेले काही अनपेक्षित असे बदल पाहता फक्त आयुष्मानला त्याच्या याच निर्णयाचा आणि इच्छेचा पश्चात्ताप होत आहे हेच आता स्पष्ट झालं आहे.