अभिनेता आयुष्यमान खुरानाला पितृशोक! ज्योतिषाचार्य पी. खुराना यांचे निधन
Ayushmann Khurana Father Death: तुमचा लाडका अभिनेता आयुष्यमान खुराना आणि अभिनेता अपारशक्ती खुराना यांचे वडिल ज्योतिषाचार्य पी. खुराना (Astrologer P. Khurana Death) यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झाले आहे. या बातमीनं आयुष्यमानच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
Ayushmann Khurana Father Dies: लोकप्रिय अभिनेता आयुष्यमान खुरानाचे वडील ज्योतिषाचार्य पी खुराना (Ayushmann Khurana Father News) यांचे आज सकाळी चंदीगढमध्ये निधन झाले आहे. आज संध्याकाळी 5.30 वाजता चंदीगढच्या मणिमाजरा शमशाम घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मागच्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती अखेर आज त्यांचे निधन झाले आहे. पंजाबच्या मोहालीस्थित फोर्टिस हॉस्पिटल येथे त्यांना भरती करण्यात आले होते. ते हृदयरोगानं (Ayushaman Khurana Father Death news) ग्रस्त होते.
त्यांच्या या निधनानं बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोक व्यक्त केला जातो आहे. त्याचे फॅन्सही त्याच्या दु:खात सामील झाले आहेत. आयुष्यमान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुराना यांच्या पीआरनं यावर एक स्टेटमेंट जाहीर केले आहे त्याच म्हटले आहे की, सांगण्यास अत्यंत शोक वाटतो आहे की, आयुष्यामान आणि अपारशक्ती यांचे वडिल ज्योतिषाचार्य पी खुराना (Astrologer P. Khurana) यांचे आज सकाळी 10 वाजता निधन झाले आहे. त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. यावेळी झालेल्या वैयक्तिक दु:खामुळे परिवाराला दिलेल्या सात्वंनाचे आम्ही आभारी आहोत.
वडिलांच्या 'त्या' एका कृतीनं गाठलं बॉलिवूड?
त्यांच्या वडिलांना कुठेतरी माहिते होते की आयुष्यमानला बॉलिवूडमध्ये चांगले यश मिळणार आहे कारण आयुष्यमानच्या वडिलांनीच त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करण्यास सांगितले होते आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये त्याला येण्यास सांगितले होते. त्यांचा आपल्या मुलावर चांगला विश्वास होता. आयुष्यमान हा आपल्या वडिलांच्या खूप जवळ होता. सोबतच त्यानं एका इंटरव्ह्यूमध्ये हे सांगितलेही होते की, तो आपल्या बॉलिवूडमध्ये यशाचे संपुर्ण श्रेय हे वडिलांना देतो. त्यांनीच त्याला मुंबईला जायचा सल्ला दिला होता. ते म्हणाले होते की एक दिवस माझा मुलगा हा सुपरस्टार बनणार आहे.
हेही वाचा - आई तू... बाबा मी....; Indian Idol फेम राहुल वैद्यच्या घरी हलणार पाळणा
कोण आहे आयुष्यमान खुराना?
आयुष्यमान खुराना हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. टेलिव्हिजनमधून सुरूवात करत त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 2012 साली आलेल्या विकी डोनर या चित्रपटानंतर आयुष्यमानला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर त्याच्या चित्रपट निवडीवरून आणि त्याच्या आगळ्यावेगळ्या अभिनयशैलीवरून त्याचे बी-टाऊनमध्ये प्रचंड कौतुक करण्यात आले आहे. त्याचा भाऊ अपारशक्ती खुराना हा देखील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. त्यानंही ओटीटी आणि अनेक चित्रपटांतून भुमिका निभावल्या आहेत. त्या दोघांचेही फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. आयुष्यमान खुरानानं अभिनेत्री तहिरा कश्यपशी लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत. सध्या त्याच्या या बातमीनं सगळीकडूनच शोक व्यक्त केला जातो आहे.