आई तू... बाबा मी....; Indian Idol फेम राहुल वैद्यच्या घरी हलणार पाळणा

Rahul Vaidya and Disha Parmar: सध्या बी-टाऊनमध्ये सेलिब्रेटी हे आपली गुडन्यूज देताना दिसत आहे. आता अशाच एका कपलनं त्यांची गुडन्यूज (Rahul Vaidya) दिली आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या या फोटोंची सगळीकडेच चर्चा आहे. तुम्ही त्यांचे फोटोज (Rahul Vaidya Photos) पाहिलेत का? 

गायत्री हसबनीस | Updated: May 19, 2023, 03:57 PM IST
आई तू... बाबा मी....; Indian Idol फेम राहुल वैद्यच्या घरी हलणार पाळणा title=

Rahul Vaidya and Disha Parmar: सध्या बॉलिवूडमध्ये गुडन्यूजवर गुडन्यूज चाहत्यांना ऐकायला मिळत आहेत. त्यातून आता अजून एका अभिनेत्यानं एक गुडन्यूज (Bollywood Celebrity News) दिली आहे. राहूल वैद्य आणि त्याच्या पत्नीनंही गुडन्यूज दिली आहे. त्यांच्या घरीही लवकरच नवा पाहुणा येणार आहे. सोशल मीडियावर त्यांनी आपल्या चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. दिशा परमार वैद्य हिनं इन्टाग्रामवरून ही गुडन्यूज त्यांच्या चाहत्यांनी दिली आहे. यावेळी तिनं आपले सोनोग्राफीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यावेळी त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स (Rahul Vaidya and Disha Parmar Announces Pregnancy) केल्या आहेत. सध्या त्यांचे हे फोटो त्यांच्या सगळीकडेच व्हायरल होत आहेत. 

यावेळी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याद्वारे त्यांनी ही गुडन्यूज दिली आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री गौहर खान हिनं आपल्या बाळाची गुडन्यूज दिली होती. बाळाच्या जन्मानंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर तिनं तिच्या बाळाची पहिली झलकही दाखवली होती. आता बिग बॉस फेम राहूल वैद्य (Bigg Boss Rahul Vaidya) यांनी आपल्या येणाऱ्या बाळाची गुडन्यूज दिली आहे. 

चाहत्यांना गुडन्यूज

त्या दोघांच्या गुडन्यूजनं त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या या पोस्टवर नानातऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्या दिशानं आपल्या सोनोग्राफीचा फोटो शेअर केला आहे. एका फोटोमध्ये त्या दोघांनी 'मम्मी एण्ड डॅडी' (Rahul Vaidya Good News) असं लिहिल एकमेकांचा फोटो पोस्ट केला आहे. दिशा परमार यावेळी काळा ड्रेस परिधान केला होता. सोनोग्राफीचा फोटो शेअर करत त्या दोघांनीही ही गुडन्यूज दिली आहे. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. 

हेही वाचा - ''लहानपणी पेनाची शाई तोंडात जायची तेव्हा...'', निळी लिपस्टिक लावल्यानं उर्वशी रौतेला ट्रोल

कोण आहेत दिशा परमार आणि राहूल वैद्य ? 

दिशा परमार आणि राहुल वैद्य हे दोनही मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत. राहूलनं लोकप्रिय सिंगिंग शो इंडियन आयडॉलमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर त्याला प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. त्यानं अनेक लोकप्रिय मालिकांतूनही अभिनय केला आहे. सोबत खतरों के खिलाडी 11 आणि बिग बॉस 14 मध्येही सहभाग दर्शवला होता. याचशोमध्ये त्यांनी एकमेकांना प्रपोज केले होते आणि मग त्यांनी लग्न केले. दिशा परमार ही लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा' (Disha Parmar) या मलिकेतून तिनं काम केले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या बी-टाऊनमधील सेलिब्रेटी हे आपली गुडन्यूज देताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे यावेळी राहूल वैद्यनं ही गुडन्यूज देत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.