मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्या तिच्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यग्र आहे. विकी कौशलसोबत कतरिना लग्न करणार आहे. पण, इथे चर्चा सुरु झालीये ती म्हणजे कतरिना आणि हृतिकची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही चर्चा होण्यामागचं कारण ठरत आहे एक व्हिडीओ. 'झिंदगी ना  मिलेगी दोबारा' या चित्रपटातून हृतिक आणि कतरिनाची जोडी पाहायला मिळाली होती. 


बॉलिवूडमधल्या या जोडीच्या नव्या केमिस्ट्रीला चाहत्यांचीही चांगलीच पसंती मिळाली होती. कतरिना आणि हृतिक त्यांच्या एका किसंग सीनमुळंही विशेष गाजले. 


सुरुवातीला हा सीन अतिशय मोठा होता. पण, त्यानंतर मात्र या सीनवर कात्री मारण्यात आली. 


असं म्हटलं जातं की, हा सीन सुरुवातीला पूर्ण 3 मिनिटांचा होता. पण, त्यानंतर मात्र तो लहान करण्यात आला. सदर दृश्याबाबत चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तर आणि निर्मात्यांमध्ये चर्चा झाली. 


अखेर किसींग सीनवर कात्री मारण्याचा निर्णय झाला. 3 मिनिटांचा किसींग सीन मर्यादेहून जास्त वाटू लागतो जो चित्रपटासाठी तितकासा गरजेचा नसतो. ज्यामुळं त्यावर कात्री चालली. 


झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटानं तरुणाईला वेड लावलं होतं. आजही, प्रदर्शनानंतर जवळपास 10 वर्षे उलटूनही हा चित्रपट तितकाच लोकप्रिय आहे. 


दरम्यान, कतरिना सध्या विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकण्यासाठी जयपूरला रवाना झाली आहे. आताच्या घडीला बॉलिवूडमध्ये या दोन सेलिब्रिटींशी निगडीत बऱ्याच चर्चा आणि गोष्टी चर्चेत आल्या आहेत. किसींग सीनचा हा किस्साही त्यापैकीच एक.